ट्रेनचे इंजिन ढकलून सुरू करता येईल का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 02:50 PM2023-07-11T14:50:21+5:302023-07-11T14:51:52+5:30
एका ट्रेनला धक्का देत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्याकडे रस्त्यात कार किंवा ट्रक बंद पडल्यानंतर धक्का देऊन सुरू केली जाते. काल एका ट्रेनला धक्का देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन सोशल मीडीयावर जोरदार चर्चा सुरू आहेत. यात ट्रेनला धक्का देऊन सुरू करता येते का असा प्रश्न केला जात आहे.
पोलीस आणि रेल्वे कर्मचारी धक्का देऊनन ट्रेन सुरू करत असल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे, यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे, पण खरंच असं होऊ शकतं का? चला समजून घेऊया.
धक्कादायक! वंदे भारत ट्रेनवर पुन्हा एकदा दगडफेक; 4 खिडक्यांच्या फुटल्या काचा
ट्रेन धक्का देऊन सुरू होते का हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला ट्रक, बस किंवा कार धक्का देऊन कशा सुरू होतात हे समजून घेतले पाहिजे. रस्त्यावरील वाहनांमध्ये, इंजिन आणि चाके यांच्यातील समन्वयाचे काम क्लच आणि गियर बॉक्सद्वारे केले जाते. थांबलेल्या कारला ढकलले जाते आणि कार जरा वेगात असताना ड्रायव्हर क्लचमधून पाय काढतो, तेव्हा गिअरबॉक्स इंजिनच्या क्रँकशाफ्टला जोर लावतो आणि ते वेगाने फिरू लागते.
धक्का देऊन ट्रेन कधीच सुरू होऊ शकत नाही. याचे कारण म्हणजे ट्रेनमध्ये ना क्लच आहे ना गिअरबॉक्स. रेल्वे अभियंता अनिमेश कुमार यांच्या मते, गिअर बॉक्स नसल्यामुळे रेल्वे इंजिनचा क्रॅंकशाफ्ट फिरू शकत नाही. इंजिन फिरेपर्यंत सुरू होणार नाही. जर अनेकांनी एकत्र येऊन ताकद लावली तर ते ट्रेन थोडी पुढे सरकवू शकतात किंवा मागे घेऊ शकतात. याशिवाय काही करू शकत नाही, पण ट्रेन सुरू करु शकत नाही.
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे ट्रान्समिशन यांत्रिक असते, म्हणजे क्लच आणि गियर बॉक्स, तर ट्रेनचे इंजिन पूर्णपणे इलेक्ट्रिक ट्रान्समिशनवर चालते. त्यामुळे कधी वाटेत ट्रेनचे इंजिन अचानक थांबले आणि ऑटो सुरू झाला नाही, तर बॅटरीच्या सहाय्याने इंजिन सुरू केले जाते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत रेल्वेच्या एका डब्ब्याला आग लागली होती, त्यामुळे तो डब्बा वेगळा करण्यासाठी लोक धक्का देत होते असं सांगण्यात आले आहे.