व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड केले जाऊ शकतात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:40 AM2023-06-11T10:40:58+5:302023-06-11T10:41:14+5:30
थर्ड पार्टी ॲप्सच्या मदतीने ते केले जाऊ शकते.
एंड टू एंड एन्क्रिप्शन व्हॉट्सॲप आणि अन्य व्हीओआयपी ॲप्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सेवा प्रदान करतात. याचा अर्थ फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच ते वाचू-ऐकू शकतो. इतरांसाठी ते कोडच्या भाषेत म्हणजेच अर्थहीन असेल. सामान्य फोन कॉल टॅप करणे हे सेवा प्रदात्याच्या हातात असते, परंतु एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे सेवा प्रदात्यास व्हीओआयपी कॉल रेकॉर्ड करणे शक्य नसते. परंतु, थर्ड पार्टी ॲप्सच्या मदतीने ते केले जाऊ शकते.
सतर्क राहणे गरजेचे
दुसऱ्या बाजूने बोलणारी व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर तुम्हाला त्याचे संकेत मिळतीलच असे नाही. तरीही सुरक्षितता हवी असल्यास काही रेकॉर्डिंग डिटेक्टर ॲप्स आहेत. कॉल रेकॉर्डिंग डिटेक्टर हे असेच एक ॲप आहे, जे तुम्हाला अलर्ट करण्याचा दावा करते.
कॉल रेकॉर्डर ॲप्स
क्यूब एसीआर हे ॲप सर्व प्रकारचे कॉल रेकॉर्ड करू शकते. एक कोटीहून अधिक लोकांनी याचा वापर केला आहे. याशिवाय कोकोस्पाय, यूमोबिक्स, एमस्पाय असे अनेक ॲप्स कॉल रेकॉर्डिंगसाठी वापरता येतात.