Canon चा नवीन कॅमेरा EOS R भारतात लाँच; जाणून घ्या खासियत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:01 PM2018-09-22T16:01:46+5:302018-09-22T16:02:22+5:30
कॅनॉनने भारतात आपला पहिल्या फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा EOS R लाँच केला आहे. या कॅमेऱ्याची किंमत 1,89,950 रुपये (फक्त बॉडी) इतकी आहे.
नवी दिल्ली : कॅनॉनने भारतात आपला पहिल्या फुल-फ्रेम मिररलेस कॅमेरा EOS R लाँच केला आहे. या कॅमेऱ्याची किंमत 1,89,950 रुपये (फक्त बॉडी) इतकी आहे. तर, EOS R किट (RF24-105mm f/4L IS USM लेन्स)च्या सोबत या कॅमेऱ्याची किंमत 2,78,945 रुपये इतकी आहे. दरम्यान, या कॅमेऱ्याची विक्री येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्यात येणार आहे.
EOS R कॅमेऱ्यासोबत कंपनीने चार नवीन RF लेन्स, दोन सुपर टेलिफोटो लेन्स आणि एक प्राईम EF-M यावेळी लाँच केले. नवीन EOS R सोबत EOS R इकोसिस्टमला पूर्ण करण्यासाठी चार वेगवेगळे RF माउंट अॅडप्टर्स सुद्धा सादर केले आहेत.
EOS R स्पेसिफिकेशन...
- 30.3 मेगापिक्सल फुल-फ्रेम CMOS सेन्सर
- कॅनॉन DIGIC 8 इमेज प्रोसेसर
- 5,655 सेलेक्टेबल AF प्वाइंट्स
- ISO रेंज 100-40,000 पर्यंत
- 8fps पर्यंत बर्स्ट शूटिंगचा सपोर्ट
- डुअल पिक्सल AF सिस्टिम
नवीन कॅनॉनच्या लेन्सची किंमत..
- RF24-105mm f/4L IS USM - 88,995 रुपये
- RF50mm f/1.2L USM - 1,85,995 रुपये
- RF28-70mm f/2L USM - 2,42,995 रुपये
- RF35mm f/1.8 MACRO IS STM - 40,995 रुपये
- EF-M32mm f/1.4 STM - 34,995 रुपये
- EF400mm f/2.8L IS III USM - 9,69,995 रुपये
- EF600mm f/4L IS III USM - 10,50,995 रुपये