सावधान ! आधार कार्डचा नंबर चुकल्यास 10000 दंड होऊ शकतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 04:20 PM2019-11-12T16:20:46+5:302019-11-12T16:32:38+5:30
आयकर कायदा 1961 नुसार केलेल्या बदलामध्ये पॅन नंबरच्या जागी आधार नंबरचा वापर केला जाऊ शकतो.
आधार कार्डचा वापर आता प्रत्येक सरकारी कामासाठी करावा लागत आहे. अशावेळी बऱ्याचदा आधारचा नंबर मागितला जातो. आयकर विभागानेही करदात्यांच्या सोईसाठी पॅन नंबरच्याऐवजी आधार नंबर घेण्यास सुरूवात केली. मात्र, सावध व्हा नाहीतर 10000 रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.
आयकर कायदा 1961 नुसार केलेल्या बदलामध्ये पॅन नंबरच्या जागी आधार नंबरचा वापर केला जाऊ शकतो. यानुसार जर आधारचा नंबर चुकीचा दिला गेला तर यामध्ये दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. हा नियम जिथे पॅन नंबरच्या जागी आधार क्रमांक वापरला जाऊ शकतो त्याच ठिकाणी लागू होणार आहे. जसे की आयकर भरताना, बँक खाते उघडताना किंवा 50 हजार रुपयांपेक्षा जास्त बॉन्ड्स, म्युच्युअल फंड आदी खरेदी करण्यासाठी पॅन नंबरच्या जागी आधार नंबर दिला जातो.
या परिस्थितींमध्ये दंड लागू शकतो...
पॅन कार्डच्या जागी चुकीचा आधार नंबर दिला तर
कोणत्याही प्रकारचे ट्रान्झेक्शनवर पॅन किंवा आधार पैकी एकही न दिले तर
आधार नंबरसोबत बायोमेट्रीक ओळख न दिली तर किंवा यामध्ये काही समस्या आली तर दंड भरावा लागू शकतो.