Apple युजर्सना मोठा धोका! लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; केंद्राने दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 12:59 PM2024-08-04T12:59:49+5:302024-08-04T13:00:58+5:30
केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे.
जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने सायबर क्राईमबाबत आयटी सेलला अलर्ट केलं आहे. यासोबतच iPhones, iPads आणि Apple च्या सर्व युजर्ससाठी इशारा देण्यात आला आहे.
Apple युजर्सना अलर्ट करताना, त्यांनी सावध राहावं, अन्यथा स्पॅम कॉल, मेसेज किंवा फोन स्पूफिंगद्वारे महत्त्वाची माहिती आणि डेटा लीक होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने जारी केला अलर्ट
केंद्र सरकारच्या सिक्योरिटी एडवाजर, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT) याबाबत एक ॲडव्हायझरी जारी केली असून ही परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सीईआरटीच्या ॲडव्हायझरीनुसार, Apple उत्पादनांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत ज्यामुळे अटॅकर्स संवेदनशील माहितीपर्यंत पोहचू शकतात.
सीईआरटीचे म्हणणं आहे की, हॅकर्स फोनमधील महत्त्वाची माहिती लीक करू शकतात. यासह सिक्योरिटी बॅरियर्स पार करणे, सर्व्हिस डिनाय करणं आणि सिस्टमवर स्पूफिंग अटॅकना देखील परवानगी दिली जाऊ शकते.
कोणत्या सॉफ्टवेअर युजर्सना समस्या?
Apple सॉफ्टवेअरच्या सीरीजमध्ये त्रुटी आढळल्या आहेत त्यामध्ये १७.६ आणि १६.७.९ पूर्वीच्या iOS आणि iPadOS सीरीज, १४.६ पूर्वीच्या macOS सीरीज, १३.६.८ पूर्वीच्या macOS Ventura सीरीज यांचा समावेश आहे. याशिवाय, १२.७.६ पूर्वीची macOS Monterey सीरीज, १२.७.६ पूर्वीची watchOS सीरीज १०.६, १७.६ पूर्वीची tvOS सीरीज आणि इतर सीरीजचा समावेश आहे.
यापूर्वी, Apple ने गेल्या आठवड्यातच आपले लेटेस्ट सिक्योरिटी अपडेट्स शेअर केले होते आणि लेटेस्ट व्हर्जन ऑफिशियल पोर्टलवर अपलोड केलं आहे, जे सर्व युजर्स वाचू शकतात. आता CERT-In ने सर्व युजर्सना Apple द्वारे अपलोड केलेल्या आवश्यक सॉफ्टवेअरचे अपडेट लागू करण्यास सांगितलं आहे.