भारतात धमाका करणार ‘मेड इन इंडिया’ OS स्मार्टफोन; केंद्र सरकारचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:37 PM2022-01-30T19:37:15+5:302022-01-30T19:38:03+5:30

या नव्या ऑपरेटिंग सिस्टमचे स्मार्टफोन्स खूप खास असतील. यातील फिचर्समुळे युजर्सला स्मार्टफोन वापरण्याचा चांगला अनुभव मिळेल

Central government is working on a policy to facilitate the creation of a homegrown mobile operating system (OS) | भारतात धमाका करणार ‘मेड इन इंडिया’ OS स्मार्टफोन; केंद्र सरकारचं मोठं पाऊल

भारतात धमाका करणार ‘मेड इन इंडिया’ OS स्मार्टफोन; केंद्र सरकारचं मोठं पाऊल

Next

नवी दिल्ली – भारतात आतापर्यंत Android आणि OS प्लॅटफॉर्म असलेल्या स्मार्टफोनचा वापर केला जात आहे. स्मार्टफोनची लाखोंमध्ये विक्री होते. परंतु आता लवकरच भारतीयांसाठी नव्या ऑपरेटिंग सिस्टमची भेट मिळण्याची शक्यता आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम पूर्णत: भारतात बनवली जाणार असून Android आणि OS ऑपरेटिंग सिस्टमला तगडी टक्कर देणार आहे.

या नव्या ऑपरेटिंग सिस्टमचे स्मार्टफोन्स खूप खास असतील. यातील फिचर्समुळे युजर्सला स्मार्टफोन वापरण्याचा चांगला अनुभव मिळेल. भारत सरकार सध्या ही ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. लवकरच ते लॉन्च होऊ शकेल. भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती जनसंपर्क विभागेच राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अलीकडेच याचा खुलासा केला. सरकार बनवत असलेल्या ऑपरेटिंग सिस्टममुळे इकोसिस्टम बनवण्यास मदत मिळेल. जी शिक्षण आणि स्टार्टअप क्षेत्रात फायदेशीर ठरणार आहे.

तसेच मेड इन इंडिया ऑपरेटिंग सिस्टम IOS लाही टक्कर देण्याची क्षमता ठेवते.ज्यावर Apple चे आयफोन काम करतात. आयफोन जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे. ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो. Android ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित स्मार्टफोन हे आयफोनच्या तुलनेने स्वस्तात मिळतात आणि त्यात जास्त फिचर्सही उपलब्ध असतात. तरीही IOS क्रेझ सातत्याने वाढत आहे. हे पाहता भारत सरकार एक नवं ऑपरेटिंग सिस्टम तयार करत आहे. जे दोघांनाही टक्कर देईल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवा इतिहास नोंदवेल. ही ऑपरेटिंग सिस्टम कधीपर्यंत भारतात दाखल होईल याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. परंतु सध्याची स्थिती पाहता सरकार लवकरात लवकर भारतात ही सिस्टम लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.   

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय रे भाऊ?

ऑपरेटिंग सिस्टम हे एक सॉफ्टवेअर आहे जे यूजर आणि संगणक किवा मोबाइल हार्डवेअर दरम्यान मध्यस्थी म्हणून कार्य करते. तसेच इतर प्रोग्राम्स चालविण्यासाठी प्रत्येक मोबाइल आणि संगणकामध्ये कमीतकमी एक ऑपरेटिंग सिस्टम असणे गरजेचे आहे. ऑपरेशन सिस्टमशिवाय संगणक अथवा मोबाइल वापरणंही अशक्य आहे. मोबाइलची मेमरी आणि प्रक्रिया तसेच त्याचे सर्व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर व्यवस्थापित करते.

Web Title: Central government is working on a policy to facilitate the creation of a homegrown mobile operating system (OS)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.