सेंटरीक ए1 : जाणून घ्या सर्व फीचर्स
By शेखर पाटील | Published: November 30, 2017 12:53 PM2017-11-30T12:53:12+5:302017-11-30T12:54:31+5:30
सेंटरीक मोबाइल्सने भारतीय ग्राहकांसाठी सेंटरीक ए१ हा स्मार्टफोन १०,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे.
सेंटरीक मोबाइल्स हा प्रियंका कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा ब्रँड आहे. या कंपनीने आता सेंटरीक ए१ या नावाने नवीन स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. हा स्मार्टफोन क्लासिक व्हाईट गोल्ड, एनर्जेटीक ब्लॅक ग्रे आणि व्हायब्रंट गोल्ड या तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यात क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ३.० या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असल्यामुळे अवघ्या ३० मिनिटात ही बॅटरी ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आलेले आहे.
सेंटरीक ए१ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले असून यावर ड्रॅगनटेल ग्लासचे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट आवृत्तीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.