सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल
By शेखर पाटील | Updated: January 8, 2018 18:42 IST2018-01-08T18:42:00+5:302018-01-08T18:42:27+5:30
सेंटरीक मोबाईल्स या भारतीय कंपनीने सेंटरीक एल३ या नावाने नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

सेंटरीक एल३ स्मार्टफोन दाखल
सेंटरीक मोबाईल्स या भारतीय कंपनीने सेंटरीक एल३ या नावाने नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
बहुतांश भारतीय उत्पादक हे किफायतशीर दरातील मॉडेल्सला प्राधान्य देत असतात. या अनुषंगाने सेंटरीक एल३ हा स्मार्टफोनही ६,७४९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. हे मॉडेल ग्राहकांना क्वॉर्टझ् ग्रे आणि रायसीन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे.
सेंटरीक एल३ स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) २.५ डी वक्राकार आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. या मॉडेलमध्ये डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. यातील बॅटरी ३०५० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १५ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे.