CES 2019 : जगातला पहिला नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 03:11 PM2019-01-09T15:11:09+5:302019-01-09T16:35:59+5:30

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये Consumer Electronics Show चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कंपन्यांना CES च्या माध्यमातून त्यांचे नवनवीन डिव्हाईस जगासमोर आणण्याची संधी मिळते.

ces 2019 asus zenbook s13 launched with notch display | CES 2019 : जगातला पहिला नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप लाँच

CES 2019 : जगातला पहिला नॉच डिस्प्लेचा लॅपटॉप लाँच

Next
ठळक मुद्देअसुस या कंपनीनेही आपला सर्वात स्लीम अल्ट्राबुक असुस झेनबुक एस13 (Asus ZenBook S13) हा लॅपटॉप लाँच केला आहे. लॅपटॉपमध्ये स्मार्टफोनसारखे फीचर देण्यात आले असून तो जगातील पहिला नॉच डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. असुसच्या या लॅपटॉपचे वजन 1.13 किलोग्रॅम इतके असून तसेच 13.9 इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले आहे.

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये Consumer Electronics Show चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कंपन्यांना CES च्या माध्यमातून त्यांचे नवनवीन डिव्हाईस जगासमोर आणण्याची संधी मिळते. असुस या कंपनीनेही आपला सर्वात स्लीम अल्ट्राबुक असुस झेनबुक एस13 (Asus ZenBook S13) हा लॅपटॉप लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये स्मार्टफोनसारखे फीचर देण्यात आले असून तो जगातील पहिला नॉच डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. 

असुसच्या या लॅपटॉपचे वजन 1.13 किलोग्रॅम इतके असून तसेच 13.9 इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमधून ग्राहकांना 97 टक्के डिस्प्ले मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लॅपटॉपची बॉर्डर खूपच कमी असून हा जगातील पहिला सर्वात जास्त स्लीम असलेला लॅपटॉप आहे, असा असुस कंपनीने दावा केला आहे. असुस झेनबुक एस13 ची विक्री जानेवारी ते मार्च 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. 

असुस झेनबुक एस13 या लॅपटॉपमधील अन्य फीचर्सचा विचार केल्यास या लॅपटॉपमध्ये एनविडियाचा जेनफोर्स MX150 ग्राफिक्स आणि इंटेलचा 8 वा जेनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे. तसेच याशिवाय लॅपटॉपमध्ये 16 जीबीचा रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. या लॅपटॉपमध्ये कंपनीने कॅमेरा डिस्प्लेही वरच्या बाजूस दिला आहे. मात्र या लॅपटॉपची किंमत किती असणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

Web Title: ces 2019 asus zenbook s13 launched with notch display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.