CES 2019 : आपलं जगणं सोपं करण्यासाठी येतेय 'ब्रेडबोट'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 04:29 PM2019-01-08T16:29:07+5:302019-01-08T17:01:55+5:30
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये जगातील सर्वात मोठ्या टेक्नोलॉजीच्या Consumer Electronics Show (CES) चे आयोजन करण्यात आले आहे. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील नावाजलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
कॅलिफोर्निया - अमेरिकेच्या लास वेगासमध्ये जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजीच्या Consumer Electronics Show (CES) चे आयोजन करण्यात आले आहे. 8 जानेवारी ते 12 जानेवारी या दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात जगभरातील नावाजलेल्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने या शोमध्ये नवनवीन प्रयोग करण्यात आले असून ब्रेड तयार करणारी स्वयंचलित मशीन याचं मुख्य आकर्षण ठरली आहे.
ब्रेडबोट
ब्रेडबोट असं या कार्ब वेंडींग मशीनचं नाव असून स्वादिष्ट ब्रेड या मशीनच्या साहाय्याने झटपट तयार करता येतात. या मशीनच्या मदतीने व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, व्हिट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड अशा सर्व प्रकारचे ब्रेड तयार करता येतात. ब्रेडबोटच्या मदतीने एका तासात मानवाच्या मदतीशिवाय 10 ब्रेड तयार करता येतात. ब्रेड जास्त दिवस खाण्यायोग्य राहावा यासाठी त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह्जचा हमखास वापर केला जातो. मात्र विल्किंसन बेकिंग कंपनीच्या मते ब्रेडबोटच्या ब्रेडमध्ये कमी प्रिझर्व्हेटीव्ह्जची गरज असते. यावर्षाच्या शेवटी याची चाचणी करण्यात येणार आहे.
डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईस
तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगात अनेक गोष्टींचा ताण येत असतो. मात्र हा ताण हलका करण्यासाठी तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईस तयार करण्यात आले आहे. सेराफीन या बाराकोडा समूहाच्या कंपनीने डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईसची निर्मिती केली आहे.
डिजिटल प्रलोभनापासून दूर राहण्यासाठी डिजिटल डिटॉक्सिन डिव्हाईसची मदत होते. अनेकदा स्मार्टफोनच्या ब्राईटनेसचा डोळ्यांना त्रास होतो. मात्र या डिव्हाईसच्या मदतीने हा त्रास कमी होणार आहे. तसेच रात्रीची झोपही व्यवस्थित असणार आहे. मुई हा 600 डॉलरचा एक लाकडाचा तुकडा आहे. Google असिस्टंट व्हॉइस कंट्रोल्ससह एक टचस्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये नियमित स्क्रिनपेक्षा अधिक नैसर्गिक इंटरफेस देण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या मदतीने युजर्सना बातम्या आणि हवामानाबाबतची माहिती मेसेजच्या मदतीने लाकडी पाटीवर असलेल्या पांढऱ्या भागावर देण्यात येणार आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.