तुमच्या फोनचे आयुष्य वाढवायचे आहे का? मग आत्ताच या 5 सवयी बदला  

By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 02:03 PM2021-06-07T14:03:06+5:302021-06-07T14:03:49+5:30

Smartphone Tips: फोन योग्य ठिकाणी ठेवल्यास, अधिकृत अ‍ॅक्सेसरीज वापरल्यास आणि रात्रभर चार्जिंगला न ठेवल्यास दीर्घकाळ चांगला राहू शकतो.  

Change these 5 bad habits for long life of smartphone   | तुमच्या फोनचे आयुष्य वाढवायचे आहे का? मग आत्ताच या 5 सवयी बदला  

आधुनिक फोन दिवसभर वापरता यावेत म्हणून बनवण्यात आलेले असतात. परंतु, दिवसभर फोन वापरल्यावर त्यात कॅशे फाईल्स जमा होतात.

googlenewsNext

फोन म्हणजे दैनंदिन आयुष्यातील सोबती बनला आहे. एखादी वस्तू आपण रोज वापरू लागलो कि आपण त्या वस्तूची आपण इतकी काळजी घेत नाही. फोनची नीट काळजी घेतली नाही तर फोन बिघडू शकतो. फोन बिघडण्यामागे आपल्या काही सवयी असतात, त्यांची माहिती आम्ही पुढे देत आहोत. या सवयी तुम्ही जर बदलल्यात तर तुमचा फोन दीर्घकाळ सुस्थितीत चालेल.  

1. दिवसभर फोन वापरणे  

मला खात्री आहे, अनेकांना हा मुद्दा आवडणार नाही. आधुनिक फोन दिवसभर वापरता यावेत म्हणून बनवण्यात आलेले असतात. परंतु, दिवसभर फोन वापरल्यावर त्यात कॅशे फाईल्स जमा होतात. या तात्पुरत्या फाईल्सचे प्रमाण जास्त झाल्यावर फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे जमल्यास दिवसातून एकदा किंवा निदान आठवड्यातून दोनदा फोन बंद करून चालू करावा. असे केल्याने फोन मधील तात्पुरत्या फाईल्स डिलीट होतात.  

2. रात्रभर फोन चार्ज करणे  

रात्रभर फोन चार्ज केल्यावर ओव्हर चार्जमुळे तुमचा फोन खराब होईल, असे नाही. परंतु, भारतात विजेचे वोल्टेज कमी जास्त होत असते, अस्थिर वोल्टेजमुळे फोनच्या बॅटरीमध्ये बिघाड येऊ शकतो. त्यामुळे रात्रभर फोन चार्जिंगला ठेवणे टाळावे.  

3. चुकीच्या जागी फोन ठेवणे 

काही लोक फोन शर्टच्या वरच्या खिशात ठेवतात, तिथून फोन पडण्याची शक्यता असते. फोन गाडीच्या गरम डॅश बोर्डवर ठेवल्यास, फोनची बॅटरी तापून ब्लास्ट होण्याची शक्यता असते. टेबल किंवा इतर कोणत्याही जागेवर फोन ठेवल्यावर फोनची कॅमेरा लेन्स आणि डिस्प्लेवर स्क्रॅच पडण्याची शक्यता असते. तसेच फोन पाण्याजवळ देखील ठेवू नये.   

4. अनधिकृत अ‍ॅप्स इंस्टॉल करणे  

फोनमध्ये अ‍ॅप्स इंस्टॉल करण्यासाठी गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅप स्टोरचे अधिकृत पर्याय असतात. परंतु, अनेकदा आपण अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घेतो. या अ‍ॅप्समुळे तुमच्या फोनमध्ये मालवेअरचा व्हायरसहोऊ शकतो.  

5. कोणाचाही चार्जर आणि ईयरफोन वापरणे  

फोनसोबत नेहमी अधिकृत चार्जर आणि इयरफोन्सचा वापर करावा. कारण इतर कोणत्याही चार्जरमुळे तुमचा चार्जिंग स्लॉट खराब होऊ शकतो तसेच, बॅटरी देखील बिघडू शकते.  

Web Title: Change these 5 bad habits for long life of smartphone  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.