अरे बापरे! ChatGPT ने लावला लैंगिक छळाचा खोटा आरोप, लॉ प्रोफेसर म्हणाले, मी आयुष्यात असे कधीच केले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 03:54 PM2023-04-09T15:54:03+5:302023-04-09T15:54:47+5:30
ChatGPT नोव्हेंबर महिन्यात लाँच झाले.
ChatGPT नोव्हेंबर महिन्यात लाँच झाले. या संदर्भात अनेक दावे करण्यात आले आहेत. चॅट जीपीटी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देतं असा दावा यात करण्यात आला होता. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. यावरुन वाद-विवादही झाले,आता ChatGPT प्रकरणी आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका लॉ प्रोफेसरने हा दावा केला आहे. चॅट जीपीटीने लैंगिक छळाचा खोटा आरोप केला होता, असा दावा या प्रोफेसरांनी केला आहे. पण हे सर्व खोट असल्याच त्यांनी सांगितलं होते.
SIM KYC: नवं सिम खरेदी करणं झालं आणखी सोपं, आता ऑनलाइन होणार KYC व्हेरिफिकेशन!
हे प्रकरण जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठचे आहे. कायद्याच्या प्राध्यापकाने एक ब्लॉग लिहिला आणि चॅटजीपीटीने एका बातमीपत्राच्या आधारे एका लैंगिक छळाचा आरोप कसा लावला हे सांगितले.
हे अत्यंत धोकादायक तंत्रज्ञान आहे. हे मानवी मनाला गोंधळात टाकू शकते. कारण जेव्हा तुम्हाला यातून कोणतेही उत्तर जाणून घ्यायचे असेल, तेव्हा चुकीचे तथ्य तुमच्यासमोर ठेवले जाईल. गुगल सर्चचे प्रमुख आणि उपाध्यक्ष प्रभाकर राघवन यांनी चॅट जीपीटीच्या नकारात्मक प्रभावाबाबत आधीच शंका व्यक्त केली होती. ChatGPT ची मूळ कंपनी OpenAI आहे. त्याचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले होते की, त्यांच्या सॉफ्टवेअरमुळे लोकांना चुकीची माहिती पोहोचण्याची भीती आहे. प्राध्यापकासोबत घडलेल्या या प्रकरणामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कायद्याच्या प्राध्यापकाची प्रतिमा मलीन झाली आहे.
यूसीएलएच्या प्राध्यापकाचा ई-मेल आल्यावर कायद्याच्या प्राध्यापकाला याची माहिती मिळाली. त्यांनी चॅट जीपीटीला यूएस लॉ स्कूलमधील प्राध्यापकांकडून लैंगिक छळाच्या पाच प्रकरणांची यादी करण्यास सांगितले. चॅट जीपीटीने उत्तर दिले तेव्हा त्यात या प्राध्यापकाचेही नाव होते. ते खूप घाबरले आणि अस्वस्थ झाले. चॅट GPT ने स्वतः एक बातमी लेख तयार केला आहे. असे असताना अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध झालेली नाही. म्हणजेच आपल्यावरील आरोपांच्या बातम्या त्यांनीच छापल्या.
'मी जॉर्जटाउन विद्यापीठात कधीही शिकवले नाही. तर लेखात या विद्यापीठाबद्दल सांगितले होते. दुसरे म्हणजे असा कोणताही लेख वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेला नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत मी माझ्या विद्यार्थ्यांना कधीही अलास्का टूरवर नेले नाही. माझ्यावर असे कोणतेही आरोप आजवर झालेले नाहीत. त्यातही हाच दावा करण्यात आला आहे, असंही प्रोफेसर म्हणाले.