14 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Smartwatch लाँच; पाण्यात देखील चालेल सुसाट
By सिद्धेश जाधव | Published: June 27, 2022 12:52 PM2022-06-27T12:52:39+5:302022-06-27T12:55:08+5:30
Amazfit BIP 3 स्मार्टवॉचमध्ये SpO2 सेन्सर, स्ट्रेस मॉनिटर आणि हार्ट रेट सेन्सर देण्यात आला आहे.
Amazfit नं जागतिक बाजारात दोन नवीन स्मार्टवॉच सादर केले आहेत. Amazfit BIP 3 सीरीज अंतर्गत BIP 3 आणि BIP 3 Pro असे दोन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. परंतु यातील फक्त स्टँडर्ड मॉडेलच भारतीयांच्या भेटीला आहे. 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्सना सपोर्ट करणारा Amazfit BIP 3 आता भारतात सादर करण्यात आला आहे.
Amazfit BIP 3 चे स्पेसिफिकेशन्स
Amazfit BIP 3 मध्ये 1.69-इंचाचा TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 240x280 पिक्सल रेज्योलूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला 2.5D टेम्पर्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच 5 ATM वॉटर रेजिस्टन्ससह येतं, त्यामुळे पाण्यात देखील हे व्यवस्थित वापरता येतं. यात अनेक हेल्थ रिलेटेड फीचर्स देण्यात आले आहेत.
Amazfit BIP 3 मध्ये SpO2 मॉनिटर रक्तातील ऑक्सिजन लेव्हल मोजण्यासाठी देण्यात आला आहे आहे. हे वॉच स्ट्रेस लेव्हल देखील मॉनिटर करतो. तसेच मेन्स्ट्रुअल सायकल, हार्ट रेट आणि स्लीप मॉनिटर असे हेल्थ फीचर्स देखील मिळतात. कंपनीनं यात PAI Health Assessment System ला सपोर्ट देखील दिला आहे.
या स्मार्टवॉचमध्ये स्मार्ट नोटिफिकेशन फीचर मिळतं. त्यामुळे युजर्सना कॉल, मेसेज, ईमेल, वेदर आणि अन्य अॅप्सचे अपडेट्स मिळतात. Amazfit BIP 3 मध्ये 280mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टवॉच रेग्युलर अॅक्टिव्हिटी आणि GPS सर्विससाठी मोबाईल नेटवर्कचा वापर करून सिंगल चार्जवर 14 दिवस वापरता येतो.
Amazfit BIP 3 ची किंमत
Amazfit BIP 3 ची किंमत 3499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, लाँच ऑफर अंतर्गत 27 जूनला हे घड्याळ 2999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून केली जाईल.