बिल्ट-इन माईक आणि स्पीकरसह Smartwatch लाँच; Maxima Max Pro Turbo ची किंमत परवडणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:10 IST2022-06-18T17:09:36+5:302022-06-18T17:10:13+5:30
Maxima Max Pro Turbo भारतात वॉयस असिस्टंट आणि ब्लूटूथ कॉलिंग फीचरसह सादर करण्यात आलं आहे.

बिल्ट-इन माईक आणि स्पीकरसह Smartwatch लाँच; Maxima Max Pro Turbo ची किंमत परवडणारी
Maxima ब्रँडनं आपला स्मार्टवॉच पोर्टफोलीयो वाढवला आहे. कंपनीनं स्टायलिश डिजाइन आणि शानदार फीचर्ससह एक किफायतशीर डिवाइस लाईनअपमध्ये जोडला आहे. SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरिंग फिचरसह Maxima Max Pro Turbo ची एंट्री झाली आहे. चला जाणून घेऊया या नव्या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स.
Maxima Max Pro Turbo ची किंमत
कंपनीनं Maxima Max Pro Turbo इंटोडक्ट्री प्राईसवर लाँच केलं आहे. तुम्ही हे डिवाइस 2,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. मॅक्सिमाचं नवीन स्मार्टवॉच तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता. स्मार्टवॉच मिडनाइट ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, आर्मी ग्रीन आणि सिल्वर कलरमध्ये फक्त ऑनलाईन उपलब्ध होईल.
फीचर्स
स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा HD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 550 Nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. Maxima Max Pro Turbo मध्ये AI वॉयस असिस्टंट, ब्लूटूथ कॉलिंग आणि अॅक्टिव्ह स्क्रॉल क्राउन देण्यात आला आहे. यातील अनेक वॉच फेस कस्टमाइज लूक देण्यास मदत करतात. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा वापर करून तुम्ही फोनवरील कॉल्स एका क्लीकनं म्यूट करू शकता
वॉचमध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच यात SpO2 मॉनिटरिंग, हॉर्ट रेट मॉनिटरिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. वॉचमध्ये इनबिल्ट माईक आणि स्पिकर मिळतो, त्यामुळे वॉचवरूनच कॉल करता येईल. सोबत डायल पॅड, अॅड कॉन्टॅक्ट आणि रिसेंट कॉल्सचा पर्याय देखील आहे.