iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर
By सिद्धेश जाधव | Published: July 20, 2021 01:04 PM2021-07-20T13:04:58+5:302021-07-20T13:06:20+5:30
5G iPhone SE 2022 : गेल्यावर्षी लाँच झालेल्या iPhone 12 सीरीजमधील Apple A14 Bionic चिपसेट iPhone SE 3 मध्ये देखील दिला जाऊ शकतो.
Apple ने गेल्यावर्षी 5G स्मार्टफोन्स लाँच करण्यास सुरुवात केली होती. गेल्यावर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 सीरीजमध्ये कंपनीने iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लाँच केले होते. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि आगामी iPhone 13 सीरीजमध्ये देखील 5G कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. परंतु त्यापेक्षा जास्त चर्चा iPhone SE 3 मध्ये मिळणाऱ्या 5G कनेक्टिव्हिटीची आहे, कारण हा सर्वात स्वस्त 5G आयफोन असू शकतो. (iPhone SE 2022 with Apple A14 Bionic may arrive next year)
मॅक रुमर्स वेबसाइटने iPhone SE 3 संबंधित ही बातमी दिली आहे. रिपोर्टनुसार अॅप्पल कंपनी ‘एसई’ सीरीजच्या आगामी मॉडेल आयफोन एसई3 मध्ये ए14 बॉयोनिक चिपसेट देऊ शकते. हा चिपसेट गेल्यावर्षीच्या आयफोन 12 सीरीजमध्ये देण्यात आला होता. Apple A14 Bionic चिपसेट कंपनीचा पहिला 5जी फोन प्रोसेसर आहे.
आयफोन एसई ही अॅप्पलची स्वस्त स्मार्टफोन सीरिज आहे. सध्या अॅप्पलचा सर्वात स्वस्त 5G फोन iPhone 12 आहे. जर आगामी iPhone SE 3 मध्ये आयफोन 12 मधील चिपसेट देण्यात आला तर हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G आयफोन ठरू शकतो. Apple ने अजूनतरी iPhone SE 3 च्या लाँच किंवा चिपसेटची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार आयफोन एसई 3 यावर्षी पुढल्या वर्षी 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो.