Xiaomi चा सर्वात स्वस्त 5जी फोन; इतकी आहे शानदार Redmi 10 5G ची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 11:51 AM2022-03-30T11:51:35+5:302022-03-30T11:51:56+5:30
Redmi 10 5G स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेटसह बाजारात आला आहे.
Xiaomi आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी जगभर ओळखली जाते. कंपनी कमी पैशात जास्त फीचर्स असलेले फोन्स बाजारात आणते. त्यामुळे स्वस्तात 5G फोन देखील शाओमी सादर करेल अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. तसे अनेक बजेट 5G फोन कंपनीनं रेडमी ब्रँड अंतर्गत सादर केले आहेत. परंतु आता शाओमीचा सर्वात स्वस्त 5जी फोन Redmi 10 5G लाँच झाला आहे. ज्यात 50MP Camera, 5,000mAh battery आणि MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे.
Redmi 10 5G चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10 5जी मध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. कंपनीनं यात मीडियाटेक डिमेन्सिटी 700 चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरआणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससहन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. रेडमी 10 5जी मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi 10 5G Price
रेडमी 10 5जी स्मार्टफोनचच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 199 डॉलर (सुमारे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 229 डॉलर (सुमारे 17,300 रुपये) मोजावे लागतील. हा नवीन रेडमी डिवाइस Graphite Gray, Chrome Silver आणि Aurora Green कलरमध्ये विकत घेता येईल. हा मोबाईल भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.