सर्वांत स्वस्त मोबाईल डेटा ‘या’ देशात; ‘या’ पाच देशांमध्ये मोबाईल डेटा सर्वांत स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 09:16 AM2022-07-31T09:16:41+5:302022-07-31T09:16:51+5:30
भारतात ५ जी चाचणी आता अखेरच्या टप्प्यात असून, ५जी स्पेक्ट्रमचा लिलावही सुरू आहे. दरम्यान, जगात सर्वांत स्वस्त आणि सर्वांत ...
भारतात ५ जी चाचणी आता अखेरच्या टप्प्यात असून, ५जी स्पेक्ट्रमचा लिलावही सुरू आहे. दरम्यान, जगात सर्वांत स्वस्त आणि सर्वांत महाग १ जीबी मोबाईल डेटाचे दर असलेल्या देशांची यादी अलीकडेच ‘वर्ल्डवाइड मोबाईल डेटा प्राइसिंग २०२२’ या अहवालात प्रसिद्ध झाली. हा अहवाल २३३ देशांमध्ये १ जीबी डेटाची किंमत दर्शवितो. रिपोर्टनुसार, इस्त्रायल, इटली, सॅन मरिनो, फिजी आणि भारत हे मोबाईल डेटा सर्वांत स्वस्तात पुरविणारे टॉप-५ देश आहेत. भारत या यादीत ५व्या स्थानावर आहे, तर असाही एक देश आहे जिथे १ जीबी मोबाईल डेटासाठी सर्वांत जास्त म्हणजे तब्बल ३,००० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागतात.
सर्वांत स्वस्त १ जीबी डेटा
इस्त्रायल ०.०४ डॉलर (जवळपास ३ रुपये १७ पैसे)
इटली ०.१२ डॉलर (जवळपास ९ रुपये ५० पैसे)
सॅन मरिनो ०.१४ डॉलर (जवळपास ११ रुपये ०९ पैसे)
फिजी ०.१५ डॉलर (जवळपास ११ रुपये ८८ पैसे)
भारत ०.१७ डॉलर (जवळपास १३ रुपये ४६ पैसे)
सर्वांत महाग १ जीबी डेटा
सेंट हेलेना ४१.०६ डॉलर (जवळपास ३,२५१ रुपये)
फॉकलँड बेटे ३८.४५ डॉलर (जवळपास ३,०४५ रुपये)
साओ टोम आणि प्रिन्सिप
२९.४९ डॉलर (जवळपास २,३३५ रुपये)
टोकेलाऊ १७.८८ डॉलर (जवळपास १,४१६ रुपये)
येमेन १६.५८ डॉलर (जवळपास १,३१३ रुपये
सर्वांत महाग कोणत्या देशात?
दक्षिण अटलांटिक महासागरातील एक बेट असलेल्या सेंट हेलेना या देशात १ जीबी डेटासाठी ४१.०६ डॉलर (जवळपास ३,२५१ रुपये) मोजावे लागतात.