दगडासारखा दणकट फोन! उंचावरून पडल्यावर देखील चालेल स्मूद, 6300mAh बॅटरी आणि 20MP कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: May 7, 2022 06:06 PM2022-05-07T18:06:00+5:302022-05-07T18:06:58+5:30
Oukitel WP20 स्मार्टफोन MediaTek Helio A22 चिपसेट, 4GB रॅम आणि 6300mAh बॅटरीला सपोर्ट करतो.
Oukitel आपल्या दणकट स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनी सर्वात स्वस्त रगड स्मार्टफोन Oukitel WP20 लाँच करणार आहे. या फोनमध्ये दगडासारखी बिल्ड क्वॉलिटी देण्यात आली आहे आणि लेटेस्ट MIL-STD-810H मिल्ट्री ग्रेड सर्टिफिकेशन देखील देण्यात आलं आहे. तसेच Oukitel WP20 स्मार्टफोन MediaTek Helio A22 चिपसेट, 4GB रॅम आणि 6300mAh बॅटरीला सपोर्ट करतो.
Oukitel WP20 चे स्पेसिफिकेशन्स
Oukitel WP20 मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियोसह 5.93 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं याला Corning Gorilla Glass ची सुरक्षा दिली आहे. प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio A22 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 128GB पर्यंत मायक्रो एसडीकार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.
मागे असलेल्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 20MP चा मेन कॅमेरा आणि फोटोसेन्सेटिव्ह सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. Oukitel WP20 मध्ये 6300mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही दोन दिवस बॅकअप मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच यारील रिवर्स चार्जिंग फिचरमुळे तुम्ही या स्मार्टफोनचा वापर पावर बँक म्हणून करू शकता.
एक्सट्रा फिचर
हा एक रगड स्मार्टफोन आहे. यात IP68/69K आणि MIL-STD-810H मिल्ट्री सर्टिफिकेशन देण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन वॉटर रेजिस्टं, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ बनतो. इतका मजबूत फोन असंही वजन 297 ग्राम आहे. कंपनीनं या मोबाईलच्या डिजाईनवर देखील जास्त काम केलं आहे.
Oukitel WP20 ची किंमत
Oukitel WP20 रगड स्मार्टफोन 27 मेला AliExpress वर लाँच करण्यात येईल. कंपनीनं या मॉडेलची किंमत 188 डॉलर (सुमारे 15,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. प्री ऑर्डर केल्यास हा फोन फक्त 89.99 डॉलर (जवळपास 10,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.