चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 07:02 AM2023-06-19T07:02:44+5:302023-06-19T07:02:55+5:30

‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Check! Has Cherta come to Fane? The Center has issued an alert | चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट

चेक करा! फाेनमध्ये आलाय का चाेरटा? केंद्राने जारी केला अलर्ट

googlenewsNext

नवी दिल्ली : इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पाॅन्स टीमने एक धाेकादायक स्पायवेअर शाेधून काढला आहे. ताे तुमच्या फाेनमधील केवळ माहितीच चाेरत नाही, तर फाेनच्या कॅमेराचा वापर करून गुपचूप रेकाॅर्डिंगदेखील करताे. देशातील ४२ काेटी ॲॅण्ड्राॅइड फाेनमध्ये हा स्पायवेअर शिरला आहे. ‘स्पिन ओके’ असे त्याचे नाव असून, प्ले स्टाेरमधील १०५ ॲप्सच्या माध्यमातून ताे पसरला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हाती स्मार्टफाेन दिसताे. त्यात सर्वाधिक प्रमाण ॲॅण्ड्राॅइडवर चालणाऱ्या स्मार्टफाेनचे आहे. या स्मार्टफाेनमध्ये प्ले स्टाेरवरून आवश्यक ॲप्स लाेक गरजेनुसार डाउनलाेड करतात. मात्र, मागचा-पुढचा विचार न करता अनेकजण धाेकादायक ॲप्स डाउनलाेड करतात. हे किती धाेकादायक ठरू शकते, याची सर्वसामान्य लाेक कल्पनादेखील करू शकणार नाहीत. स्पिन ओके स्पायवेअर हा जावा स्क्रिट काेडच्या माध्यमातून हळूहळू क्षमता वाढविताे. अतिशय कमी कालावधीत ताे माेठ्या प्रमाणात पसरला आहे.

 स्पायवेअर आहे की नाही? असे ओळखा 
तज्ज्ञांनी या स्पायवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. फाेनमध्ये अनेकदा जाहिराती अचानक सुरू हाेतात. तसे हाेत असल्यास हमखास स्पायवेअर तुमच्या फाेनमध्ये असू शकताे. गेल्या काही महिन्यात डाउनलाेड केलेले ॲप्स अशा वेळी अनइन्स्टाॅल करणे याेग्य ठरेल, असे तज्ज्ञ म्हणतात.

काय करू शकताे ‘स्पिन ओके’?
-स्पिन ओके हा तुमच्या फाेनमधील कॅमेरा वापरून गुपचूप रेकाॅर्डिंग करू शकताे.
-डेटा काॅपी करून अज्ञात रिमाेट सर्व्हरवर पाठवताे.
-फाेन कुठेही ठेवला असेल तरी आजूबाजूचे आवाज रेकाॅर्ड करत राहताे.
-डिलीट केलेल्या फाइल्सदेखील ताे रिकव्हर करू शकताे. 

हे ॲप्स आहेत धाेकादायक
नाॅइस व्हिडीओ एडिटर, जायपा, बियूगाे, एमव्ही बिट, क्रेझी ड्राॅप्स, टिक, व्ही फ्लाय, कॅश जाॅइन, कॅश ईएम, फिझ्झाे हे प्रमुख ॲप्स सर्वाधिक धाेकादायक आहेत. त्यापैकी जायपा आणि नाॅइस व्हिडीओ एडिटरचे १० काेटी, 
तर बियूगाे, एवव्ही बिट या ॲप्सचे ५ काेटी यूझर्स आहेत.

Web Title: Check! Has Cherta come to Fane? The Center has issued an alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल