चिमटा काढून पहा! 24GB रॅम अन् 1TB स्टोरेज 29,999 रुपयांत; रिअलमीचा नवा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:46 PM2023-07-06T15:46:35+5:302023-07-06T15:54:10+5:30
रिअलमीने आज सर्वांना चकीत करणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 60 5G फोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे.
तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, त्याच किती जीबी स्टोरेज आहे? 128 जीबीचा जमाना गेला, आता २५६ जीबीच्या स्टोरेजची गरज लोकांना भासू लागली आहे. परंतू, एका कंपनीने तब्बल 1TB स्टोरेजवाला स्मार्टफोन लाँच केला आहे. महत्वाचे म्हणजे भल्या भल्या कंपन्या १२८ जीबी स्टोरेज ज्या किंमतीत देत आहेत त्या किंमतीत ही कंपनी १ टीबी स्टोरेज स्पेस देत आहे.
रिअलमीने आज सर्वांना चकीत करणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 60 5G फोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या सिरीजचे दोन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. यामध्ये Narzo 60 5G आणि Narzo 60 Pro 5G हे आहेत. यामध्ये मिडीयाटेक डायमेंसिटी प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. SuperVOOC फास्ट चार्जिंग देखील असणार आहे.
Narzo 60 5G मध्ये कॉस्मिक ब्लॅक आणि मार्स ऑरेंज रंग आहेत. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री 12 पासून हे फोन अॅमेझॉन व रिअलमीच्या वेबसाईट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
Narzo 60 प्रो मॉडेल कॉस्मिक नाईट आणि सनराईज व्हेरियंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते. त्याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर 12 GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.
कॅमेरा...
फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तसेच 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme Narzo 60 Pro 5G फोनमध्ये 100-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. 6-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 24 GB पर्यंत RAM (12 GB आभासी RAM) आणि 1 TB पर्यंत स्टोरेज आहे.