तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा पराक्रम; जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 04:45 PM2023-11-15T16:45:37+5:302023-11-15T16:47:25+5:30

चीनमधील ३ मोठी शहरे, बीजिंग, वुहान आणि गुआंगजो कनेक्शन हा भविष्यातील इंटरनेट टेक्नॉलॉजी इन्फास्ट्रक्चरचा भाग आहे.

China claims world’s fastest internet with 1.2 terabit-per-second network | तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा पराक्रम; जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड लॉन्च

तंत्रज्ञान क्षेत्रात चीनचा पराक्रम; जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड लॉन्च

बीजिंग – चीननेइंटरनेट क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवलं आहे. चीनच्या कंपनीनं जगातील सर्वात वेगवान इंटरनेट नेटवर्क लॉन्च केले आहे. हा प्रकल्प सिंघुआ विश्वविद्यालय, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नोलॉजीज आणि सेर्नेट कॉर्पोरेशनच्या मदतीनं पूर्ण केला आहे. लॉन्च करण्यात आलेले इंटरनेट १.२ टेराबिट डेटा प्रति सेकंद ट्रान्समिट करू शकते असा दावा करण्यात आला आहे. इंटरनेटचा हा स्पीड सध्या अस्तित्वात असलेल्या स्पीडच्या दहा पट जास्त आहे. २०२५ मध्ये चीन हा इंटरनेट स्पीड लॉन्च करणार होते परंतु वेळेआधीच चीननं हे यश संपादन केले आहे.

साऊथ चायना पोस्टनुसार, सध्या अस्तित्वात असलेल्या इंटरनेट स्पीडच्या दहा पट अधिक स्पीड मिळणे ही एकप्रकारे क्रांती आहे. पुढील पिढीसाठी ही इंटरनेट सेवा आहे. चीनचा नवा बँकबॉन नेटवर्क देशातील प्रमुख शहरांना जोडणारा डेटा हायवे असणार आहे. ३ हजार किमीहून अधिक पसरलेला हा नेटवर्क एका व्यापक ऑप्टिकल फायबर केबलिंग प्रणालीच्या माध्यमातून बीजिंग, वुहान आणि गुआगंजोला जोडेल. जिथं प्रति सेकंद १.२ टेराबिट्स म्हणजे १२०० गीगाबिट्सचा स्पीड मिळेल. जगातील बहुतांश इंटरनेट बॅकबॉन नेटवर्क १०० गीगाबिट प्रति सेकंद काम करतात. अमेरिकेने अलीकडेच ४०० गीगाबिट्स प्रति सेकंदवर ५ जी नेटवर्क आणले आहे.

चीनमधील ३ मोठी शहरे, बीजिंग, वुहान आणि गुआंगजो कनेक्शन हा भविष्यातील इंटरनेट टेक्नॉलॉजी इन्फास्ट्रक्चरचा भाग आहे. या जुलै महिन्यात हे नेटवर्क कार्यरत झाले होते. परंतु सोमवारी अधिकृतपणे ते लॉन्च करण्यात आले. नेटवर्कने सर्व चाचण्या पार केल्या आहेत. त्यात उत्तमप्रकारे यश मिळाले आहे. हा इंटरनेट स्पीड साध्या भाषेत समजायचा झाला तर केवळ एका सेकंदात १५० हाय डेफिनिशन सिनेमाच्या तुलनेत हा डेटा ट्रान्सफर करू शकतो असं हुआवेई टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष वांग लेई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुपरफास्ट लाईन न केवळ एक यशस्वी ऑपरेशन होते तर हे चीनला आणखी वेगवान इंटरनेट बनवण्याचं तंत्रज्ञान देते. सिंघुआ विश्वविद्यालयच्या जू मिंगवेईने नवीन इंटरनेट बॅकबॉनची तुलना सुपरफास्ट ट्रेनच्या ट्रॅकची केली आहे. विशेष म्हणजे या प्रणालीचे सर्व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे उत्पादन देशातंर्गत केले आहे असं चायनीज एकेडमी ऑफ इंजिनिअरींग एफआयटीआय प्रोजेक्ट लीडर वू जियानपिंग यांनी म्हटलं आहे.

Web Title: China claims world’s fastest internet with 1.2 terabit-per-second network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.