जगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 03:03 PM2018-12-14T15:03:06+5:302018-12-14T15:07:18+5:30

लोकांची मागणी आणि आवड पाहता आता मोबाइल कंपन्या वेगवेगळ्या डिझाइनचे स्मार्टफोन घेऊन येत आहेत. आता चीनची स्टार्टअफ कंपनी Royole ने बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

china company Royole launches worlds first pocket size Foldable smartphone Flexpai | जगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क!

जगातला पहिला फोल्डेबल फोन, किंमत वाचून व्हाल थक्क!

Next

लोकांची मागणी आणि आवड पाहता आता मोबाइल कंपन्या वेगवेगळ्या डिझाइनचे स्मार्टफोन घेऊन येत आहेत. आता चीनची स्टार्टअफ कंपनी Royole ने बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. एका वॉलेटसारखा दिसणारा हा फोन कंपनीने पेइचिंगमध्ये सादर केला. FlexPai फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरु झाल्या आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हा जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. दरम्यान सॅमसंगनेही त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन सादर केला आहे. 

कधी मिळणार फोन आणि किती आहे किंमत?

(Image Credit : All Images Credit NBT)

FlexPai स्मार्टफोनची चीनच्या मार्केटमध्ये १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १, ५८८ डॉलर(1,14,000 रुपये) आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १, ७५९ डॉलर(1,26,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. चीनच्या बाहेर दुसऱ्या बाजारांमध्ये फोन एक डेव्हलपर मॉडेल म्हणूनच उपलब्ध केला जाणार आहे. तर फोनची डिलिव्हरी डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 

किती आहे स्क्रीन?

अनफोल्ड ठेवल्यावर या स्मार्टफोनची स्क्रीन ७.८ इंच(1920 x 1440 पिक्सल) राहते. तर स्क्रीनचा अॅस्पेक्ट रेशिओ ४.३ आहे आणि स्क्रीन डेनसिटी ४०३ पीपीआय आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फोनमध्ये तीन डिस्प्ले दिले गेले आहेत. या तिसऱ्या डिस्प्लेमध्ये इनकमिंग कॉल, मेसेज आणि ई-मेल चेक केले जाऊ शकतात. 

किती जीबी रॅम?

स्मार्टफोन ६ जीबी आणि ८ जीबी रॅमच्या पर्यायासोबत १२८ जीबी आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येतं.

२ लाखांपेक्षा जास्त वेळ फोल्ड करु शकता

कंपनीने दावा केला आहे की, या फोनची स्क्रीन २ लाखांपेक्षा जास्त वेळा फोल्ड केली जाऊ शकते. तर या फोनचं वजन ३२० ग्रॅम आहे. तसेच फोनमध्ये २० मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 

प्रोसेसर

या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट २.४ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिलं गेलं आहे. त्यासोबतच कनेक्टिविटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, ए-जीपीएस आणि यूएसही टाइप-सी फीचर्स आहेत. 
 

Web Title: china company Royole launches worlds first pocket size Foldable smartphone Flexpai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.