धक्कादायक! चिनी कंपनीच्या फोनमध्ये 'खतरनाक' मॅलवेअर; युझर्सचा डेटा, पैसे दोन्ही चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:35 PM2020-08-26T15:35:45+5:302020-08-26T15:48:55+5:30

"एक चिनी कंपनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये मॅलवेअर प्री-इंस्टॉल करत होती आणि याचा वापर करून युझर्सच्या डेटाची आणि पैशांची चोरी केली जात होती."

china company was pre installed malware in smartphones was stealing users data and money | धक्कादायक! चिनी कंपनीच्या फोनमध्ये 'खतरनाक' मॅलवेअर; युझर्सचा डेटा, पैसे दोन्ही चोरी

धक्कादायक! चिनी कंपनीच्या फोनमध्ये 'खतरनाक' मॅलवेअर; युझर्सचा डेटा, पैसे दोन्ही चोरी

Next
ठळक मुद्देTranssion Holdings कंपनी ऑफर करत असलेल्या चिनी ब्रँड Tecnoवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.टेक्नो आणि इनफिनिक्स हे दोन्ही बँड्स भारतात जबरदस्त लोकप्रिय आहेत.Tecno W2 स्मार्टफोनमध्ये दोन मॅलवेअर xHelper आणि Triada आढळून आले आहेत.

नवी दिल्ली - चिनी कंपन्यांचे स्मार्टफोन कमी किमतीत जास्त फिचर्स देत असल्याने अधिक लोकप्रिय आहेत आणि भारतात यांना मोठी बाजारपेठही आहे. शाओमी आणि रियलमी सारखे ब्रँड्स बजेट रेंजमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंत केले जातात. मात्र, एक नवा अहवाल चिनी फोन वापरणाऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. या अहवालानुसार, एका चिनी कंपनीकडून आपल्या स्मार्टफोन्समध्ये मॅलवेअर प्री-इंस्टॉल केला जात होता आणि त्याच्या सहाय्याने युझर्सच्या डेटाची आणि पैशांची चोरी केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सध्या, Transsion Holdings कंपनी ऑफर करत असलेल्या चिनी ब्रँड Tecnoवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कंपनीचे इतर दोन ब्रँड्स Itel आणि Infinix अँट्री-लेवल बजट फोन तयार करतात. टेक्नो आणि इनफिनिक्स हे दोन्ही बँड्स भारतात जबरदस्त लोकप्रिय आहेत. तसेच यांचे आणखी एक मोठे मार्केट आफ्रिकादेखील आहे. मोबाईल सिक्यूरिटी सर्व्हिस Secure-D आणि BuzzFeed कडून करण्यात आलेल्या तपासात समोर आले आहे, की कंपनीच्या डिव्हाईसमध्ये मॅलवेअर प्री-इंस्टॉल करण्यात आले आहेत.

धोकादायक आहे मॅलवेअर -
Tecno W2 स्मार्टफोनमध्ये दोन मॅलवेअर xHelper आणि Triada आढळून आले आहेत. यांच्या सहाय्याने युझर्सच्या परवानगी शिवाय, त्यांच्या मोबाईलमध्ये कोणतेही अ‍ॅप इंस्टॉल केले जाऊ शकतात आणि सर्व्हिसेसचे सब्सक्रिप्शनही घेतले जाऊ शकते. हा स्मार्टफोन वापरणाऱ्या एका युझरला आढळून आले, की त्याचा डेटा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून काहीही माहीत नसताना सर्विस सब्सक्रिप्शनचा मेसेज त्याला आला आहे. महत्वाचे म्हणजे, या युझरने त्या सर्व्हीससाठी कसल्याही प्रकारचे साइन-अप केलेले नव्हते.

कंपनीने मान्य केली चूक -
यानंतर Tecno W2 फोनमध्ये Triada आणि xHelper मॅलवेअर असल्याचेही सिद्ध झाले. Buzzfeed च्या अहवालानुसार, यासाठी कंपनीने सप्लाय चेन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच मॅलवेअरमुळे आपल्याला कसल्याही प्रकारचा नफा नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. मात्र, किती स्मार्टफोनमध्ये मॅलवेअर आहे, यासंदर्भातील माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.

या ब्रँडमध्येही मॅलवेअर -
Secure-D च्या माहिती नुसार, याच्या सिक्यॉरिटी सिस्टिमने 844,000 फ्रॉड ट्रांजेक्शन ब्लॉक केले आहेत. हे ट्रांजेक्शन्स गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबरदरम्यान स्वस्त स्मार्टफोन्समध्ये इंस्टॉल मॅलवेअरच्यासहाय्याने करण्यात आले होते. सिक्यूरिटी फर्मने म्हटले आहे, की TCL टेक्नॉलॉजीच्या Alcatel च्या फोनमध्येदेखील मॅलवेअर प्री-इंस्टॉल केल्याचे आढळून आले आहे. ही कंपनी भारतात फोन तयार करत नाही. मात्र, ब्राझील आणि म्यानमारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

Web Title: china company was pre installed malware in smartphones was stealing users data and money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.