China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 11:28 AM2020-02-05T11:28:31+5:302020-02-05T11:37:11+5:30

कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अ‍ॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. 

China Coronavirus apple shipments to fall by 10 percent due to coronavirus outbreak | China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे.अ‍ॅपलचं व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने कंपनीने चीनमधील आपले कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेरिंग सेंटर बंद केले.

नवी दिल्ली - चीनमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 492 लोक मृत्युमुखी पडले असून 20 हजार 400 जणांना त्याची लागण झाली आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अ‍ॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. 

TF इंटरनेशनल सिक्यॉरिटी अ‍ॅनालिस्ट मिंग-ची कुओने 2020 च्या पहिल्या तिमाहीत अ‍ॅपलच्या शिपमेंटमध्ये 10 टक्क्यांनी घट झाल्याचं सांगितलं आहे. कुओने पहिल्या तिमाहीत ग्लोबल आयफोन शिपमेंट 36 ते 40 मिलियन असून ती आधीच्या तुलनेत 10 टक्के कमी झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने कंपनीने चीनमधील आपले कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेरिंग सेंटर बंद केले आहेत. तसेच अँड्रॉईड उत्पादनाचे कारखाने बंद करण्यात आले आहेत. 

Apple चं सर्वात स्वस्त मॉडेल आयफोन SE2 (iPhone SE2) चे लिक्स समोर आल्यानंतर आता या फोन संदर्भातील माहिती समोर आली आहे. लिक झालेले फीचर्सनुसार आयफोन SE2 ची डिझाईन आयफोन 8 (iPhone 8) शी मिळती जुळती आहे. तसेच फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये टच आयडी बटण देण्यात आला आहे. आयफोन SE2 चा हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स आयफोन 8 सारखा असणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

apple ihone se iphone 6 iphone 6s and iphone 6s plus sales stopped in india | Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण

अ‍ॅपलने 2020 या नव्या वर्षामध्ये आयफोन SE2 चे 3 आणि 4 कोटी युनिट विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. जुना आयफोन SE कमी किंमत असल्याने लोकांच्या पसंतीस उतरला आहे. तर आयफोन SE 2 जुन्या मॉडेलपेक्षा जरा महाग आहे. एअर इंडियाने चीनमधील शहरांत जाणारी विमाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची विमाने 7 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात चीनला जाणार नाहीत. दुसरीकडे चीनचे नागरिक तसेच चीनचा पासपोर्ट बाळगणारे अन्य देशांचे नागरिक यांना भारतात प्रवेश करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

IND vs NZ, 1st ODI Live Score: शतकवीर श्रेयस अय्यर माघारी, टीम इंडियाचे त्रिशतक

निर्भयाच्या गुन्हेगारांना एकाचवेळी फासावर लकटवणार की वेगवेगळे? आज निर्णय

Delhi Election 2020 : 'पंतप्रधान मोदी ताजमहालही विकतील', राहुल गांधीचं टीकास्त्र

'सरकारचा 'रिमोट कंट्रोल' नेमका कुणाकडे?', उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

एनआरसीचा भाजपातील 'हिंदूनाही' फटका बसणार; उद्धव ठाकरेंचा इशारा

केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक कोंडी; उद्धव ठाकरेंचा आरोप

 

Web Title: China Coronavirus apple shipments to fall by 10 percent due to coronavirus outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.