TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 10:04 AM2020-07-01T10:04:47+5:302020-07-01T10:25:17+5:30
भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्लीः मोदी सरकारने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. त्यानंतर भारतीय युजर्सनी चिंगारी हे ऍप मोठ्या प्रमाणात ड़ाऊनलोड केलं आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आतापर्यंत जवळपास ३० लाख लोकांनी हे चिंगारी हे ऍप डॉऊनलोड केलं असून, प्रत्येक तासाला या ऍप्सला २० लाख व्ह्यूज मिळत आहेत. भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे भारतीयांनी टिकटॉककडे पाठ फिरवत चिंगारी हे ऍप मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आहे. जवळपास आतापर्यंत 30 लाख लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. गेल्या वर्षी बंगळुरूचे प्रोग्रामर बिस्वत्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी हे अॅप तयार केले होते, जे आता गुगल प्ले स्टोअरमध्ये अव्वल स्थानी आहे. या ऍपनं डाऊनलोड करण्याच्या बाबतीत मित्रोलाही मागे सोडलं आहे. चिंगारी अॅपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झाल्यास हे वापरकर्त्यांना व्हिडीओ डाऊनलोड आणि अपलोड करण्यास, मित्रांसह गप्पा मारण्यास, माहिती शेअर करण्यास आणि फीड्सद्वारे ब्राउझ करण्याची परवानगी देत असल्यानं लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.
चिंगारी वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप स्थिती, व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स, जीआयएफ स्टिकर्स आणि फोटोंसह क्रिएटिव्ह करण्याची संधी मिळते. हे अॅप इंग्रजी, हिंदी, बांगला, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे. चिंगारी कंटेट क्रिएटरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना पैसे देखील देणार आहे. चिंगारी अॅपवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडीओवर वापरकर्त्याला व्ह्यूजनुसार पॉइंट मिळतात, हे पॉइंट्सनंतर पैशात रुपांतरित केले जातात. चिंगारी अॅप गुगल प्ले स्टोअर व ऍपल अॅप स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
I hadn’t ever downloaded TikTok but I have just downloaded Chingari... More power to you... https://t.co/9BknBvb8j3
— anand mahindra (@anandmahindra) June 28, 2020
आनंद महिंद्रांनी देखील चिंगारी अॅप केले डाऊनलोड
कधीही टिकटॉकचा वापर न केलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही चिंगारी ऍप डाऊनलोड केलं असून, तुम्हाला अधिक शक्ती मिळेल, असं म्हटलं आहे.
हेही वाचा
यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार
आजचे राशीभविष्य - 1 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी