चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:50 PM2022-09-20T12:50:29+5:302022-09-20T12:51:18+5:30
चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत.
नवी दिल्ली-
चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. केंद्र सरकारकडून चीनी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात Wechat, Tiktok सह ३०० चीनी मोबाइल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे चीनी कंपन्यांचा भ्रमनिरास होत असून भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी केली आहे.
चीनी कंपन्या आता भारताला पर्याय शोधू लागल्या आहेत की जिथं मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग केली जाऊ शकेल. काहींच्या म्हणण्यानुसार भारतात मजुरीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळे चीनी कंपन्या भारताऐवजी इतर शेजारील देशांमध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहेत.
ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार चीनी कंपन्या भारत सोडून इतर पर्यायात इजिप्त, इंडोनेशिया, बांगलादेश आणि नायजेरियाचा विचार करत आहेत. चीनी कंपन्यांकडून या देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट देखील सुरू केले जात आहेत. कंपन्या सध्या या देशातील परिस्थिती, क्षमता, पॉलिसी आणि मजुरी खर्च याचा आढावा घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच स्थानिक सरकारसोबत चर्चा देखील केली जात आहे. चीनी कंपन्या भारतातून शिफ्ट होऊन इतर देशात गेल्यास याचा मोठा फटका देशाला बसू शकतो.
वार्षिक तब्बल २० कोटी प्रोडक्शन
ओप्पोकडून इजिप्तमध्ये २० कोटी डॉलर खर्चून फोन निर्मितीचा प्लांट निर्माण केला जात आहे. ओप्पो प्लांटची वार्षिक प्रोडक्शन क्षमता ४.५ कोटी इतकी आहे. चिनी कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प उभारल्यानंतर पुढील ५ वर्षांत इजिप्तमध्ये ९०० हून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.