VLC मीडिया प्लेयर अडून चिनी हॅकर्सचा हल्ला; सिस्टम हॅक करून करतायेत हेरगिरी  

By सिद्धेश जाधव | Published: April 9, 2022 07:49 PM2022-04-09T19:49:32+5:302022-04-09T19:49:58+5:30

चिनी हॅकिंग ग्रुप Cicada VLC प्लेयरमध्ये एक मालवेयर फाईल जोडून त्याचा वापर हॅकिंगसाठी करत आहेत.  

Chinese Hackers Group Cicada Is Using Malware Infected VLC Media Player For Hacking  | VLC मीडिया प्लेयर अडून चिनी हॅकर्सचा हल्ला; सिस्टम हॅक करून करतायेत हेरगिरी  

VLC मीडिया प्लेयर अडून चिनी हॅकर्सचा हल्ला; सिस्टम हॅक करून करतायेत हेरगिरी  

Next

चिनी हॅकिंग ग्रुप Cicada आता VLC मीडिया प्लेयरचा वापर विंडोज सिस्टम हॅक करण्यासाठी करत आहे. विंडोज पीसीवर मोठ्याप्रमाणावर व्हीएलसी प्लेयर दिसून येतो. कारण या मीडिया प्लेयरसाठी पैसे द्यावे लागत नाहीत, यात सर्व प्रकारच्या मीडिया फाईल्स ओपन होतात आणि हे ओपन सोर्स अ‍ॅप्लिकेशन आहे. त्यामुळे याच्या लोकप्रियतेचा फायदा हा हॅकिंग ग्रुप घेत आहे.  

चीनी हॅकिंग ग्रुप Cicada विंडोज सिस्टमवर VLC प्लेयरच्या माध्यमातून मालवेयर पाठवत आहे. मालवेयर असलेल्या मीडिया प्लेयर एखाद्या युजरनं डाउनलोड केला की त्याचा वापर करून कंप्यूटर हॅक केला जातो. हॅक केलेल्या सिस्टमचा वापर हेरगिरी करण्यासाठी केला जातो. अशी माहिती Symantec सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सनी दिली आहे. 

अशी होते हॅकिंग 

व्हीएलसी मीडियाची फाईल ओपन सोर्स असल्यामुळे तिच्यात बदल करणं सोपं जातं. Cicada याचा फायदा घेऊन प्लेयरच्या मूळ फाईलसोबत मालवेयर जोडतो. एकदा हे व्हर्जन व्हिक्टीमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल झालं की Cicada एक VNC रिमोट-अ‍ॅक्सेस सर्वरच्या मदतीनं इंफेक्टेड सिस्टमला कंट्रोल करतो. असे हल्ले हेरगिरी करण्यासाठी 2021 पासून केले जात आहेत, असं Symantec नं सांगितलं आहे.  

रिपोर्टनुसार, Cicada ग्रुपनं आरोग्य सेवा क्षेत्राला याआधीच लक्ष्य केलं आहे. आता संरक्षण, विमान, शिपिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील लोकांना लक्ष्य केलं जात आहे. या ग्रुपचं जाळं अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग, तुर्की, इज्राइल, भारत, मोंटेनेग्रो आणि इटलीमध्ये पसरलं आहे. त्यामुळे VLC मीडिया प्लेयर फक्त videolan.org या अधिकृत वेबसाईटवरूनच डाउनलोड करा. तसेच अन्य सॉफ्टवेयर देखील अधिकृत वेबसाईट किंवा विंडोज अ‍ॅप स्टोर मधून मिळवा.  

Web Title: Chinese Hackers Group Cicada Is Using Malware Infected VLC Media Player For Hacking 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.