सावधान! झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन गायब होतात चीनी हॅकर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:26 PM2023-10-21T18:26:57+5:302023-10-21T18:33:43+5:30

चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत. असे हजारो एप्स आहेत. 

chinese loan scam how scammers are trapping users report | सावधान! झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन गायब होतात चीनी हॅकर्स

सावधान! झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन गायब होतात चीनी हॅकर्स

चीनी लोन स्कॅममध्ये अडकून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बनावट कर्ज एप्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यांची नावे बदलल्यानंतर ते परत येतात. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने वॉर्निंग दिली आहे की, चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत. असे हजारो एप्स आहेत. 

CloudSEK च्या रिपोर्टनुसार, हे स्कॅमर्स बेकायदेशीर लोन एप्स वापरत आहेत. लोकांना फसवण्यासाठी ते पुरेसे कर्ज आणि सहज परतफेडीची खोटी आश्वासने देतात. लोकांचे वैयक्तिक तपशील आणि फी घेऊन हे स्कॅमर्स गायब होत आहेत. रिपोर्टमध्ये असे 55 अँड्रॉइड एप्स वेगवेगळ्या माध्यमातून समोर आले आहेत. संशोधकांनी सांगितलं की, अशा फसवणूक योजना चालवणारे 15 पेमेंट गेटवे चीनमधून चालवले जात आहेत.

केवळ भारतातच नाही तर इतर देशांतील लोकांची फसवणूक करण्यासाठी चीनी व्यक्ती या बनावट पेमेंट गेटवेचा वापर करत आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण आफ्रीका, मेक्सिको, ब्राझील, तुर्की, व्हिएतनाम, फिलीपाईन्स आणि कोलंबिया यांसारख्या देशांमध्येही त्यांचे नेटवर्क पसरलेले आहे.

हे स्कॅमर्स कसं काम करतात?

चीनी स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी लोन एप्स तयार करतात. या बेकायदेशीर एप्सचा प्रचार केला जातो. जेव्हा एखादा युजर हे एप डाउनलोड करतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक तपशील चोरतात आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे घेतात. हे स्कॅमर्स पैसे दिल्यानंतर गायब होतात. 

या गोष्टी ठेवा लक्षात 

स्कॅमर्स सामान्य लोकांना लक्ष्य करतात ज्यांना कर्जाबद्दल फारशी माहिती नसते. साधारणपणे या लोकांना छोट्या कर्जाची गरज असते. अशा परिस्थितीत, तुम्ही अनोळखी इन्स्टंट लोन देणार्‍या एप्सबाबत सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. कर्ज देण्याच्या नावाखाली हे अएप्स तुमचे कॉन्टॅक्ट, फोटो आणि व्हिडिओ अशी वैयक्तिक माहिती चोरतात. त्यानंतर ते युजर्सना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. कर्ज घेण्यासाठी तुम्ही नेहमी विश्वसनीय सोर्स वापरावा. याशिवाय, कोणत्याही एपला तुमची माहिती घेण्याची परवानगी देऊ नका.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: chinese loan scam how scammers are trapping users report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.