चीनच्या स्मार्टफोन कंपन्या भारतातून खोऱ्याने पैसा ओढतात...बहिष्कार फसला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:38 PM2018-10-29T17:38:24+5:302018-10-29T17:42:50+5:30
भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठ खेळण्यांपासून दैनंदिन वापरातील वस्तूंनी चीनने व्यापलेली आहेच. मात्र, चीनच्या चार मोबाईल कंपन्यांनी भारतातून खोऱ्याने पैसा नेला आहे. शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि हुवाई या कंपन्यांनी 2018 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 51,722.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
देशामध्ये गेल्या काही वर्षात चीनविरोधी वातावरण असले तरीही भारतीयांची पसंती चिनी बनावटीच्या उत्पादनांना असल्याचे यावरून दिसत आहे. या कंपन्यांनी 2018 मध्ये 2017 पेक्षा 22,460 कोटी जास्त कमावले आहेत.
अॅप्पल आणि गुगललाही टाकले मागे
या चीनच्या चार कंपन्यांनी अमेरिकेच्या आघाडीच्या कंपन्या अॅप्पल आणि चीनलाही मागे टाकले आहे. अॅप्पलने 2108 मध्ये 13098 कोटी रुपये कमावले आहेत. तर गुगलने भारतातून 9337.7 कोटी रुपये कमावले आहेत.
चीनी कंपन्यांचे मोबाईल का पसंतीचे?
चीनच्या या कंपन्या स्वस्तामध्ये मोबाईल उपलब्ध करतात. यामध्ये अॅप्पलसारख्या कंपन्यांच्या मोबाईलमधील फिचर्स सहज उपलब्ध असतात. तसेच या कंपन्यांच्या मोबाईलचा दर्जाही चांगला असतो. परवडणाऱ्या किंमतीपासून प्रिमियम श्रेणीमध्येही मोबाईल उपलब्ध होतात.