चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 12:59 PM2022-12-08T12:59:57+5:302022-12-08T13:07:46+5:30

चीनसह ज्या देशांमध्ये सरकार AI पावर्ड सर्विलान्स कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांवर नजर ठेवली जाते त्या ठिकाणी याची मदत होणार आहे.

chinese students have come up with an invisibility cloat | चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात...

चीनी विद्यार्थ्यांनी बनवला 'मिस्टर इंडिया'; कोट घालताच माणूस होतो गायब, किंमतही आवाक्यात...

googlenewsNext

मिस्टर इंडिया हा चित्रपट सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये एका डिव्हाइसच्या मदतीने हिरो गायब होतो. अशीच काहीशी हटके गोष्ट आता चीनच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी एक ऑर्डिनरीसारखा दिसणारा कोट तयार केला आहे. हा कोट ह्युमन बॉडीला सिक्योरिटी कॅमेऱ्याने लपवतो, आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने मॉनिटर करणाऱ्या सिक्युरोटी कॅमेऱ्याने ह्युमन बॉडी गायब होते. InvisDefense असं नाव याला देण्यात आलं आहे. 

चीनसह ज्या देशांमध्ये सरकार AI पावर्ड सर्विलान्स कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांवर नजर ठेवली जाते त्या ठिकाणी याची मदत होणार आहे. पण काही ठिकाणी सरकार ही टेक्नॉलॉजी बॅन देखील करू शकते किंवा मग आपली सिस्टम इम्पूव्ह करण्यासाठी हे डिव्हाइस डिटेक्ट करू शकते. InvisDefense कोटला 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रिएटिव्ह कॉम्पिटिशनमध्ये पहिलं बक्षीस मिळालं आहे. 

रिपोर्टनुसार, InvisDefense  कोट मशीन व्हिजनच्या रिकॉग्निजेशन अल्गोरिदम पॅटर्नच्या माध्यमातून चकवा देतो. तसेच रात्री हा टेम्परेचर डिटेक्टिंग मॉड्यूलसोबत छेडछाड करून इंफ्रारेड कॅमेऱ्याला कंफ्यूज करतो. क्रिएटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, सरफेसवर प्रिटिंग पॅटर्न खूप स्वस्त आहे. कॅमेरा ब्लाइंड करण्यासाठी केवळ चार टेम्परेचर कंट्रोल मॉड्यूलचा वापर करण्याता आला आहे. याची सुरुवातीची किंमत CNY 500 म्हणजेच जवळपास 6000 रुपये आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chinese students have come up with an invisibility cloat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.