गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:55 PM2022-02-08T19:55:29+5:302022-02-08T20:05:26+5:30

बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

chrome user alert government issues high severity venerability warning | गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा

गुगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या खात्यावर आहे हॅकर्सची नजर, सरकारचा गंभीर इशारा

Next

जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.

एजन्सीचा वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी
देशातील सरकारी एजन्सी CERT-In ने Google Chrome वापरकर्त्यांना सावध केले आहे. हा अलर्ट व्हर्जन 98.0.4758.80 आणि आधीच्या व्हर्जनसाठी जारी करण्यात आला आहे.  एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 'गैरवापराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. Google Chrome वर, हॅकर टार्गेटसाठी सिस्टिमवर आर्बिटरी कोड लागू करू शकतो.' ( Google Chrome Users Alert)

एजन्सीने सल्लागार केला जारी 
CERT-In ने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, 'गुगल क्रोम ब्राउझरच्या 98.0.4758.80 पेक्षा जुन्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. प्रकाराच्या गोंधळामुळे V8 मध्ये वापरणे सुरक्षित नाही. यात वेब अ‍ॅप, यूजर इंटरफेस, स्क्रीन कॅप्चर, फाइल्स एपीआय, ऑटो-फिल आणि डेव्हलपर टूल्स यासारख्या अनेक त्रुटींचा समावेश आहे.(Google Chrome Browser)

सरकारी एजन्सीने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, 'या सर्व गोष्टींमुळे तुमचे डिव्हाइस हॅक होण्याचा धोका वाढतो. हॅकर्स तुमच्या ब्राउझरमध्ये प्रवेश करून तुमचा डेटा आणि बँकेशी संबंधित सर्व तपशील सहजपणे चोरू शकतात. अशा स्थितीत सुरक्षेचा विचार करून गुगल आपल्या यूजर्सला जुने व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला देत आहे.

नवीन व्हर्जन अपडेट करा - सरकार
सरकारी सूचनांमध्ये म्हटले की, 'गुगल क्रोम सुरक्षितपणे वापरण्यासाठी तसेच हॅकिंगचा धोका टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना Google Chrome च्या ब्लॉगला भेट द्यावी लागेल. नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर, तुम्ही हॅकर्सचा धोका टाळू शकता

Web Title: chrome user alert government issues high severity venerability warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.