मोबाईलवर फोटो क्लिक करा; घरबसल्या जिंका सोनं आणि भरघोस बक्षीसं, पाहा कसं
By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 04:09 PM2022-01-15T16:09:30+5:302022-01-15T16:09:42+5:30
iPhone Photography Awards: सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात.
iPhone च्या कॅमेरा कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक आयफोन युजर्स सतत करत असतात. अनेकजण iPhone चा वापर करून सुंदर सुंदर फोटोज देखील काढतात. अशा लोकांसाठी सुवर्ण संधी आली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात. या अवार्ड्सच्या विजेत्यांना सोनं आणि अॅप्पल प्रोडक्ट्स बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत.
IPPA अवार्ड्समध्ये आयफोन किंवा आयपॅड युजर्स सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी तुम्ही 31 मार्च, 2022 पर्यंत तुमचे फोटोज सबमिट करू शकता. यात सहभागी होण्यासाठी 5.50$ (410 रुपये) एंट्री फी भरावी लागेल. तुम्ही कितीही फोटो सबमिट करू शकता आणि जिंकण्याची संधी वाढवू शकता. स्पर्धेत अॅब्सट्रॅक्ट, अॅनिमल्स, आर्किटेक्चर, चिल्ड्रन, सिटीस्केप, लँडस्केप, लाईफस्टाईल, नेचर, पीपल, पोर्ट्रेट, सीरीज (3 इमेज), स्टिल लाईफ, सनसेट, ट्रॅव्हल अशा 18 कॅटेगरीजचा समावेश आहे.
स्पर्धेतील बक्षिसं
18 कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्याला एक Gold Bar मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाला प्लॅटिनम बार मिळेल. तर संपूर्ण स्पर्धेच्या विजेत्याला एक iPad Air मिळेल आणि टॉप 3 विजेत्यांना Apple Watch Series 3 देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम
- यात जगभरातील लोक सहभागी होऊ शकतात.
- हे फोटोज आधी कुठेही पब्लिश झालेले नसावेत, खाजगी सोशल मीडियावर पब्लिश झालेले फोटोज सबमिट करता येतील.
- फोटोशॉप किंवा इतर डेस्कटॉप इमेज प्रोसेसिंग प्रोग्राम करून बदल केलेले फोटो वापरता येणार नाहीत. परंतु IOS अॅपचा वापर करता येईल.
- iPhone अॅड-ऑन लेन्सचा वापर केला जाऊ शकतो.
- काही इमेजेस आयफोन, आयपॅड किंवा आयपॉडने कॅप्चर केल्या आहेत कि नाही याची शहानिशा केली जाऊ शकते.
हे देखील वाचा:
धक्का! विवोच्या या फोनने आयफोन 13 च्या कॅमेऱ्याला पछाडले; किंमतही कमी...
आजूबाजूच्या आवाजच भान ठेवत म्युजिक ऐकण्यासाठी OnePlus Buds Z2 मध्ये खास मोड; किंमतीही बजेटमध्ये