स्मार्टफोन यूझर्स करतात ‘या’ चुका, मग होतो पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 11:48 AM2018-07-09T11:48:45+5:302018-07-09T11:52:29+5:30
यूझर्स अशा काही चूका करतात ज्यामुळे नंतर पश्चाताप होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चूका सांगणार आहोत ज्या बहूतेक सर्वच यूझर्स करत असतात. या चुका तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
अँड्रॉइड स्मार्टफोन वारताना सुरुवातीच्या काळातच सर्व फीचर्स जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. काही दिवस हा स्मार्टफोन वापरल्यानंतर यूझर्सला वाटते की आपल्याला फोन संदर्भात सर्वकाही माहिती आहे आणि त्यामुळे त्या फोनची काळजी करणं आपण सोडून देतो. मात्र, याच दरम्यान यूझर्स अशा काही चूका करतात ज्यामुळे नंतर पश्चाताप होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चूका सांगणार आहोत ज्या बहूतेक सर्वच यूझर्स करत असतात. या चुका तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
चार्जिंग सायकल
सर्वात आधी तुम्हाला फोन चार्जिंग संदर्भात माहिती देतो. तुम्ही नेहमी फोन चार्जिंगला लावता आणि नंतर लगेचच तो चार्जिंगहून काढता पण ही एक मोठी चूक आहे. कारण, बॅटरीचं लाइफ सायकल असतं. एकदा फोन चार्जिंगला लावल्यानंतर तो लगेचच काढल्यास एक सायकल संपते.
बॅटरी चार्जिंग
आपल्या फोनची बॅटरी 20 टक्क्यांहून कमी झाल्यानंतर अनेकजण फोन चार्जिंगला लावतात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, या प्रकारामुळे फोनच्या बॅटरीचा परफॉर्मंस खराब होतो. फोनची बॅटरी 20 टक्क्यांपासून ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज असल्यास नेहमीच चांगले असते.
नकली मोबाइल अॅक्सेसरीज
कमी किंमतीमुळे नेहमीच युझर्स अनब्रँडेड अॅक्सेसरीज खरेदी करतात ज्यामध्ये बॅटरी, चार्जर सारख्यांचा समावेश आहे. मात्र, या अॅक्सेसरीज तुमच्या मोबाइल फोनसाठी धोकादायक असतात.
कुठूनही अॅप डाऊनलोड करणं
अँड्रॉइड फोनमध्ये थर्ड पार्टी अॅप स्टोर सपोर्ट करत नाही. यासोबतच तुम्ही साइड लोडींगच्या माध्यमातूनही अॅप इंस्टॉल करु शकता. म्हणजेच तुम्ही कम्युटरवर एपीके फाइल डाउनलोड करुन किंवा ब्ल्यूटुथच्या माध्यमातून एपीके फाइल ट्रान्सफर करणं तुमच्या फोनसाठी धोकादायक आहे. यामुळे तुमच्या फोनमध्ये वायरस येण्याची शक्यता आहे.
एकसारखा पासवर्ड
अनेकजण फेसबुक आणि जीमेलसोबतच सर्व ऑनलाइन अकाऊंटसाठी एकसारखा पासवर्ड ठेवतात. पण ही एक मोठी चूक आहे. कारण, तुमच्या एखाद्या चूकीमुळे तुमचे सर्व अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते.
होम स्क्रिनवर जास्त विजेट्स
वापरण्याकरीता सोप जावं आणि वेळ कमी लागावा यासाठी अनेकजण होमस्क्रीनवर अनेक अँप्सचे शॉर्टकट ठेवतं. पण, या सर्वांमुळे तुमची बॅटरी लवकर संपते.
अपडेट न करणं
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये नेहमीच अपडेट्स येत असतात मात्र, इंटरनेट डेटा संपत असल्याने अनेकजण अपडेट करत नाही. पण असे केल्यास त्याचा फटका तुम्हालाच बसतो कारण कंपनी नेहमीच आपल्या नव्या अपडेट्समध्ये फोन आणि अँप्स जोडत असते.
फ्री वायफाय
फ्री वायफाय मिळताच अनेकजण तो कनेक्ट करतात आणि त्याच्या माध्यमातून गाणे किंवा सिनेमा डाऊनलोड करण्यास सुरुवात करतं. पण यामुळे तुमच्या फोनमध्ये वायरस येण्याची मोठी शक्यता असते.