जिओच्या 52 रूपयाच्या पॅकला टक्कर द्यायला 'या' कंपनीने आणला 49 रूपयांचा प्लॅन, जाणून घ्या डेटापॅकची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 09:19 AM2017-12-19T09:19:51+5:302017-12-19T11:09:26+5:30
युजर्सला आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सध्या डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत.
मुंबई- युजर्सला आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सध्या डेटाप्लॅनच्या विविध ऑफर्स देत आहेत. जिओने नुकतंच 52 रूपयांचा एक डेटाप्लॅन युजर्ससाठी आणला. पण जिओच्या या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीने नवा प्लॅन बाजारात आणला आहे. एअरटेलचा हा नवा प्लॅन युजर्सला 49 रूपयांमध्ये मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी एका दिवसाची असून यामध्ये 3जी/4जी स्पीडने 1 जीबी डेटा मिळेल. याचबरोबर 1 जीबी डेटा असणारे दोन नविन प्लॅनही एअरटेलने आणले आहेत, पण त्यासाठी अधिक किंमत मोजीवी लागणार आहे. एअरटेलने 99 रूपयांचा प्रिपेड डेटाप्लॅन सुरू केला असून त्यामध्ये 2 जीबी 3जी/4जी डेटा मिळणार आहे. या पॅकची व्हॅलिडीटी 5 दिवसांची असेल. तसंच 98 रूपयांचा एक प्लॅन असून त्यामध्ये 1जीबीचा 2जी/3जी/4जी डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे.
असा करा 49 रूपयांना डेटाप्लॅन एक्टीव्हेट
- युजर्सला 'माय एअरटेल अॅप्लिकेशन'मध्ये जाऊन डेटा सेक्शनवर क्लिक करा.
- डेटा सेक्शनमध्ये व्यू बेस्ट ऑफर्सवर क्लिक करा.
- तेथे 49 रूपयांच्या डेटाप्लॅनची ऑफर दिसेल.
- या दरम्यान एक 51 रूपयांचा डेटाप्लॅनही दिसेल त्यामध्ये सारखीच सेवा उपलब्ध आहे.
जिओ कंपनीने काही दिवसांपूर्वी 52 रूपयांचा डेटाप्लॅन युजर्ससाठी आणला. 52 रूपयांच्या डेटाप्लॅनमध्ये युजर्सना 1.05जीबी डेटा तसंच वॉइसकॉल्स व मेसेज फ्रीमध्ये देण्यात आले आहेत.