Jio वापरकर्त्यांना कंपनीने दिला इशारा, चुकूनही करु नका 'ही' चूक, होईल मोठी फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:55 PM2024-08-23T17:55:24+5:302024-08-23T17:57:56+5:30
तुम्ही जर रिलायन्स जिओ यूजर असाल तर सावधान. कंपनीने वापरकर्त्यांना इशारा दिला आहे.
रिलायन्सजिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी फ्रॉडपासून सावधान राहण्याबाबत सूचना देत असते. आताही अशीच एक सूचना दिली आहे. रिलायन्सजिओने आपल्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कंपनीने स्कॅमर्सबाबत चेतावणी जारी केली आहे आणि ते सायबर फसवणूक करून लोकांची फसवणूक कशी करतात याची माहिती दिली.
शेअरबाजारात किंचित वाढ: सेन्सेक्स 81,086 अन् निफ्टी 24,823 अंकांवर बंद...
जिओने एका मेसेजमध्ये म्हटले आहे की, जिओमध्ये आमच्यासाठी तुमची सुरक्षा नेहमीच सर्वोपरि आहे. अलीकडेच आम्ही सायबर फसवणुकीची प्रकरणे पाहिली आहेत ज्यात स्कॅमर तुमच्या सेवा प्रदात्याकडून संवेदनशील माहिती विचारतात आणि तुमची फसवणूक करतात. सुरक्षित राहण्याच्या टिपांसह, जिओने स्कॅमर लोकांची फसवणूक कशी करतात याचे तपशील देखील शेअर केले आहेत.
जिओने दिल्या सूचना
स्कॅमर फोन कॉल, एसएमएस संदेश, WhatsApp चॅट किंवा ईमेलसह विविध मार्गांनी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.
स्कॅमर अनेकदा तुम्हाला पॅन कार्ड नंबर, आधार तपशील, बँक खात्याचे तपशील, क्रेडिट कार्ड तपशील, OTP किंवा सिम क्रमांक यासारखी संवेदनशील माहिती विचारतात.
स्कॅमर तुम्ही विनंती केलेले तपशील न दिल्यास तुमच्या सेवा खंडित करण्याची धमकी देतात.
स्कॅमर तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड आणि इंस्टॉल करण्यास सांगू शकतात जे त्यांना तुमचा फोन किंवा काॉप्युटर आणि तुमचे वैयक्तिक तपशील ऍक्सेस करण्यात मदत करतील.
रिलायन्स जिओ तुम्हाला कधीही थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगणार नाही. जर कोणी तुम्हाला हे सांगितल तर बहुधा हा घोटाळा आहे.
काही शंका असल्यास, MyJio ॲपमध्ये लॉग इन करा येथे तुम्हाला तुमच्या Jio नंबरशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती मिळेल.