आयफोन X vs. गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३०: तुलना
By शेखर पाटील | Published: September 13, 2017 03:19 PM2017-09-13T15:19:00+5:302017-09-13T15:19:00+5:30
अॅपलने आयफोन-X लाँच केला असला मात्र याआधी बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० आदींसारखे फ्लॅगशीप मॉडेल्स उपलब्ध आहेत. या तिन्ही मॉडेल्सचे हे तुलनात्मक अध्ययन.
अॅपलने आयफोन-X लाँच केला असला मात्र याआधी बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० आदींसारखे फ्लॅगशीप मॉडेल्स उपलब्ध आहेत. या तिन्ही मॉडेल्सचे हे तुलनात्मक अध्ययन.
आयफोन-X हा आजवरचा सर्वात शक्तीशाली आणि अनेकविध फिचर्सनी सज्ज असणारा स्मार्टफोन मानला जात आहे. मात्र सध्या बाजारपेठेत काही मॉडेल्स याच तोलामोलाचे आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० यांची नावे कुणी टाळू शकणार नाहीत. या तिन्ही फ्लॅगशीप मॉडेल्सची विविध फिचर्सबाबत तुलना केल्यानंतर आपल्याला खालील चित्र दिसून येते.
१) डिस्प्ले: आयफोन-X मॉडेलमध्ये ५.५ इंची आणि २४३६ बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले आहे. तर दोन्ही मॉडेलमधील डिस्प्ले तुलनेत मोठे आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि २९६० बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले असून हे मॉडेल फॅब्लेट प्रकारातील आहे. तर एलजी व्ही ३० मध्ये ६ इंची आणि २८८० बाय १४४० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. अर्थात दोन्ही मॉडेल्सचे स्क्रीन मोठे असले तरी आयफोन- मध्ये फेस आयडी हे अभिनव फिचर असल्याचे विसरून चालणार नाही.
२) प्रोसेसर: आयफोन-X मध्ये बायोनिक ए ११ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ तसेच ऑक्टो-कोअर सॅमसंग एक्झीनॉस ८८९५ हे दोन पर्याय असतील. तर एलजी व्ही ३० मध्येही ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर असेल.
३) रॅम/स्टोअरेज: आयफोन-X च्या रॅमबाबत अॅपलने लॉचींग कार्यक्रमात माहिती दिलेली नाही. तथापि, विश्वासू सूत्रांच्या माहितीनुसार या मॉडेलचे रॅम ३ जीबी असू शकते. दुसरीकडे सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ ची रॅम ६ जीबी तर एलजी व्ही३० ची रॅम ४ जीबी असेल. आयफोन-X मध्ये ६४ आणि २५६ जीबी स्टोअरेजचा पर्याय असून ती वाढविण्याची सुविधा नाही. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये ६४ जीबी स्टोअरेज हे दोन टेराबाईपर्यंत वाढविता येणार आहे. तसेच एलजी व्ही ३० मॉडेलमध्ये ६४ व १२८ जीबी स्टोअरेजचे पर्याय असून यातही दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.
४) कॅमेरा:- आयफोन-X मधील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्यांच्या स्वरूपात असेल. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्येही याच पध्दतीचा १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा आहे. तर एलजी व्ही ३० मॉडेलमध्ये मात्र १६ व १३ मेगापिक्सल्सचे ड्युअल कॅमेरे आहेत. तिन्ही मॉडेलमध्ये फोर-के चित्रिकरणाची सुविधा असेल. तर तिघांचे फ्रंट कॅमेरे अनुक्रमे ७, ८ व ५ मेगापिक्सल्सचे असतील.
५) बॅटरी: आयफोन-X मधील बॅटरीची क्षमता नमूद करण्यात आली नाही. तथापि, आयफोन-७ प्लस मॉडेलपेक्षा ती दोन तास जास्त चालणार असल्याचे सांगण्यात आले. या बॅटरीत २१ तासांना टॉकटाईम, तर १३ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक शक्य असल्याचेही नमूद करण्यात आले. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ आणि एलजी व्ही ३० या दोन्ही मॉडेल्समध्ये प्रत्येकी ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर तिन्ही मॉडेल्स अनुक्रमे आयओएस ११, अँड्रॉइड नोगट ७.१ आणि नोगट ७.२ या प्रणालीवर चालणारे आहेत.
६) विशेष फिचर्स- आयफोन-X मध्ये वायरलेस चार्जींग, फेस आयडी, अॅनिमोजी, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट हे विशेष फिचर्स आहेत. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्येही वायरलेस चार्जींग, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट फिचर्स असतील. तर एलजी व्ही ३० मध्ये वायरलेस चार्जींग, वॉटरप्रूफ व डस्ट रेझिस्टंट सोबत वाईड अँगल कॅमेरा फ्लोटींग बार दिलेला आहे.
७) मूल्य: आयफोन-X चे मूल्य ९९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ चे मूल्य ९५० डॉलर्सपासून सुरू होईल. तर एलजी व्ही ३० मॉडेलचे मूल्य अद्याप घोषीत करण्यात आलेले नाही. मात्र ताज्या माहितीनुसार एलजी कंपनी आपल्या या मॉडेलचे मूल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ८५० डॉलर्सच्या आसपास ठेवणार असल्याचे समजते.