5G स्वस्ताईची स्पर्धा रंगली; Vivo S7e 5G लाँच, Oneplus ला भिडणार

By हेमंत बावकर | Published: November 4, 2020 06:50 PM2020-11-04T18:50:56+5:302020-11-04T18:52:31+5:30

Vivo S7e 5G : व्हिवोचा हा फोन ५जीमधील एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यामुळे वनप्लस नॉर्डला हा फोन टक्कर देण्याची शक्यता आहे.

Competition for 5G cheaper; Vivo S7e 5G launched, will hit Oneplus | 5G स्वस्ताईची स्पर्धा रंगली; Vivo S7e 5G लाँच, Oneplus ला भिडणार

5G स्वस्ताईची स्पर्धा रंगली; Vivo S7e 5G लाँच, Oneplus ला भिडणार

Next

व्हिवोने परवडणाऱ्या श्रेणीतील पहिलावहिला 5 जी फोन लाँच केला आहे. Vivo S7e 5G आज बाजारात आणत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र, या फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती 11 नोव्हेंबरलाच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वस्तातील 5जी फोन असल्याची बाजारात चर्चा असून असे झाल्यास वनप्लस आणि मोटरोलाला थेट टक्कर मिळणार आहे. 


11 नोव्हेंबरपासूनच या फोनची विक्री सुरु केली जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 720 SoC प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. 4100mAh पावरची बॅटरी देण्यात आली असून 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 


व्हिवोचा हा फोन ५जीमधील एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यामुळे वनप्लस नॉर्डला हा फोन टक्कर देण्याची शक्यता आहे. मोटरोलानेही ५जी फोन लाँच केला होता. सध्या भारतात ५ जी नेटवर्कची ट्रायल सुरु होणार आहे. यामुळे कंपन्यांमध्ये ५जी फोनची स्पर्धा लागली आहे. हे तंत्रज्ञान महाग असल्याने कमीत कमी किंमतीत कोण फोन लाँच करते यावरही कंपन्यांचे लक्ष आहे. यामुळे भारतीय ग्राहकही या फोनकडे आकर्षित होतील अशी आशा या कंपन्यांना आहे. 


Vivo S7e 5G चे स्पेसिफिकेशंस
Mirror Black, Silver Moon आणि Phantom Blue या तीन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. 8GB RAM + 128GB या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन येणार आहे. 6.44 इंचाचा full-HD+ डिस्प्ले देण्यात आला असून 1080x2400 पिक्सल रिझोल्युशन आहे. 
Vivo S7e 5G मध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पाठीमागील कॅमेरामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमर सेन्सर, 8 मेगापिक्सल सुपर वाइड अँगल माइक्रो सेंसर, 2 मेगापिक्सलचा ब्लर इमेज फीचरचा सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय 10x digital zoom  फीचरदेखील आहे. USB Type-C port, ब्लूटूथ v5, 5G SA/NSA सारखी फिचर देण्यात आली आहेत. सध्या हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला असून लवकरच या फोनची किंमत समजणार आहे. 

Web Title: Competition for 5G cheaper; Vivo S7e 5G launched, will hit Oneplus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.