Apple : ॲपलविराेधात स्पर्धा आयाेगाचे चाैकशीचे आदेश, ॲप स्टाेअरबाबत कंपनीच्या भूमिकेवरून घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 10:01 AM2022-01-01T10:01:20+5:302022-01-01T10:02:10+5:30

Apple : ॲपलच्या आयफाेन आणि आयपॅडमध्ये विविध ॲप्स इन्स्टाॅल करण्यासाठी ॲप स्टाेअर हा एकच पर्याय आहे.

Competition Commission orders probe against Apple | Apple : ॲपलविराेधात स्पर्धा आयाेगाचे चाैकशीचे आदेश, ॲप स्टाेअरबाबत कंपनीच्या भूमिकेवरून घेतला निर्णय

Apple : ॲपलविराेधात स्पर्धा आयाेगाचे चाैकशीचे आदेश, ॲप स्टाेअरबाबत कंपनीच्या भूमिकेवरून घेतला निर्णय

Next

नवी दिल्ली : आघाडीची माेबाइल निर्माता कंपनी ॲपलविराेधात भारतीय स्पर्धा आयाेगाने सखाेल चाैकशीचे आदेश दिले आहेत. ॲप स्टाेअरबाबत कंपनीच्या भूमिकेवरून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयाेगाने दिली. 

ॲपलच्या आयफाेन आणि आयपॅडमध्ये विविध ॲप्स इन्स्टाॅल करण्यासाठी ॲप स्टाेअर हा एकच पर्याय आहे. इतर काेणत्याही ॲप स्टाेअरला या उपकरणांमध्ये परवानगी नाही, तसेच स्पर्धा नसल्याने स्वत:च्या ॲप स्टाेअरमध्ये सुधारणा करणे, तसेच नावीन्य देण्यासाठी दबावही कमी राहताे. हे स्पर्धा नियमांचे उल्लंघन असल्याचे आयाेगाचे म्हणणे आहे.

Web Title: Competition Commission orders probe against Apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.