आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 11:48 AM2020-01-13T11:48:42+5:302020-01-13T12:08:18+5:30

स्मार्टफोनच्या मदतीने स्मार्ट टीव्ही कंट्रोल करता येतो.

control your smart tv via your smartphone with remote control app | आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली -  स्मार्टफोनप्रमाणे आता स्मार्ट टीव्हीही बाजारात उपलब्ध आहे. विविध कंपन्याचे भन्नाट फीचर्स असलेल्या स्मार्ट टीव्ही घेण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. स्मार्टफोनच्या मदतीने स्मार्ट टीव्ही कंट्रोल करता येतो. मात्र यासाठी फोनमध्ये IR Blaster असणं गरजेचं आहे. हा एक प्रकारचा सेन्सर असून तो इन्फ्रारेड किरणांच्या मदतीने रिमोट डिव्हाईस कंट्रोल करतो. शाओमी आणि हुवावेसारख्या अनेक स्मार्टफोनमध्ये IR Blaster ची सुविधा ही युजर्सना देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने टीव्ही, एसी, फॅनसारख्या रिमोटवर चालणाऱ्या वस्तूंवर फोनच्या मदतीने कंट्रोल करता येतं. 

स्मार्टफोनमध्ये IR Blaster असल्यास  TV Remote Control अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही आणि रिमोटवर चालणारी अन्य उपकरणं कशी कंट्रोल करायची हे जाणून घेऊया.

Android युजर्स 

- गुगलच्या प्ले स्टोरवरून TV Remote Control हे अ‍ॅप डाऊनलोड करा.

- अँड्राईड फोन आणि स्मार्ट टीव्ही हा एकाच वाय-फाय नेटवर्कने कनेक्ट करा. 

- स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप ओपन करा आणि स्मार्ट टीव्हीच्या नावावर टॅप करा. 

ही प्रक्रिया काम करत नसेल तर 

- स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर एक पिन दिसेल. 

- फोनमध्ये तो पिन नंबर टाकून दोन्ही डिव्हाईस कनेक्ट करा. 

iOS युजर्स

- अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरून TV Remote Control अ‍ॅप डाऊनलोड करा.

- फोन आणि स्मार्ट टीव्ही हा एकाच वाय-फाय नेटवर्कने कनेक्ट करा. 

- फोनमध्ये अ‍ॅप ओपन करा आणि स्मार्ट टीव्हीच्या नावावर टॅप करा. 

ही प्रक्रिया काम करत नसेल तर 

- स्मार्ट टीव्हीच्या स्क्रीनवर एक पिन दिसेल. 

- फोनमध्ये तो पिन नंबर टाकून दोन्ही डिव्हाईस कनेक्ट करा. 

स्मार्टफोनला रिमोट करण्यासाठी AnyMote, ASmart, IR Universal आणि Peel Smart सारख्या अ‍ॅपचाही वापर करता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

'या' बातम्याही नक्की वाचा

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

Google Maps पार्किंग स्पेस शोधण्यास मदत करणार; फॉलो करा सोप्या स्टेप्स... 

लय भारी! युजर्सच्या प्रायव्हसीसाठी फेसबुकने आणले 'हे' 4 दमदार फीचर्स

Whatsapp वर आला 'New Year Virus'; वेळीच व्हा सावध

चार्जिंगबद्दल डोन्ट वरी! आता 5 दिवस चालणार बॅटरी

 

Web Title: control your smart tv via your smartphone with remote control app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.