यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा

By शेखर पाटील | Published: July 31, 2018 11:40 AM2018-07-31T11:40:46+5:302018-07-31T11:40:51+5:30

यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा मिळणार असून अँड्रॉइडच्या युजर्सला हे फिचर क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येत आहे.

The convenience of using Dark Mode now on UTub | यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा

यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा

Next

यू-ट्युबवर आता डार्क मोड वापरण्याची सुविधा मिळणार असून अँड्रॉइडच्या युजर्सला हे फिचर क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात देण्यात येत आहे. यू-ट्युब या संकेतस्थळाच्या वेब आवृत्तीला गत वर्षी डार्क मोड वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यानंतर या वर्षाच्या प्रारंभी आयओएस प्रणालीच्या युजर्सला हे फीचर देण्यात आले होते. आता याला अँड्रॉइड युजर्ससाठी देण्यात येत आहे. सध्या सर्व युजर्सला याचे अपडेट मिळालेले नसले तरी क्रमाक्रमाने याला लागू करण्यात येणार आहे. डार्क मोडमध्ये नावातच नमूद असल्यानुसार पार्श्‍वभाग हा गडद काळ्या रंगात परिवर्तीत करण्याची सुविधा मिळते. सध्या यू-ट्युबचा पार्श्‍वभाग हा पूर्णपणे पांढर्‍या रंगातला आहे. याला कुणीही युजर हव्या त्या वेळेला काळ्या पार्श्‍वभागात परिवर्तीत करू शकतो. डार्क मोड हा युजर्सला खूप उपयुक्त ठरणारा आहे.

यामुळे युजरच्या डोळ्यांवरील ताण हा बर्‍याच प्रमाणात कमी होत असतो. सध्या यू-ट्युबवर बराच काळ व्यतीत करणार्‍या युजर्सची संख्या जास्त आहे. त्यांना या मोडचा लाभ होऊ शकतो. याशिवाय, यामुळे कोणत्याही व्हिडीओमधील गडद रंग हा उठावदार पद्धतीनं अनुभवता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीची बचतदेखील होणार आहे. कोणताही अँड्रॉइड युजर आपल्या युट्युब अ‍ॅपला अपडेट करून याचा वापर करू शकतो. यासाठी त्याला सेटींगमध्ये जाऊन जनरल हा पर्याय निवडावा लागणार आहे. येथे त्याला डार्क थीम हा पर्याय दिसणार आहे. याला सिलेक्ट करताच डार्क मोड कार्यान्वित होणार आहे.

यू-ट्युबने आपल्या युजर्सला नवनवीन फीचर्स देण्यासाठी कंबर कसल्याचे अलिकडच्या काळात दिसून आले आहे. मध्यंतरी फेसबुक हे यू-ट्युबला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे अधोरेखीत झाले होते. तथापि, अलिकडच्या आकडेवारीनुसार व्हिडीओ शेअरींगमध्ये यू-ट्युबला फेसबुक पछाडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने आता यू-ट्युबनेही आक्रमक पवित्रा घेत युजर्सला आकर्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अलिकडेच यू-ट्युबच्या युजर्सला शिर्षक आणि विवरणामध्ये हॅशटॅग वापरण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहे. तर आयओएस प्रणालीच्या युजर्सच्या माध्यमातून एक्सप्लोअर या विभागाची चाचणीदेखील घेण्यात येत आहे. यातच आता डार्क मोडच्या माध्यमातून अँड्रॉइडच्या युजर्सला नाविन्यपूर्ण अनुभूती प्रदान करण्यात येत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Web Title: The convenience of using Dark Mode now on UTub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.