Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:36 AM2021-12-15T11:36:10+5:302021-12-15T11:44:28+5:30

Google And Corona Vaccine : कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. अशातच आता गुगल कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Corona Vaccine google will fire employees who do not get vaccination | Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

googlenewsNext

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटाचा जगभरातील देश सामना करत असतानाच ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलं आहे. याच दरम्यान सर्वच देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. अशातच आता गुगल कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे.

कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या नियमांचं पालन न केल्यास ते त्यांचा पगार गमावतील अन्यथा त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल असा इशारा गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. सीएनबीसीने मंगळवारी अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. गुगलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारित केलेल्या मेमोमध्ये "कर्मचार्‍यांना 3 डिसेंबरपर्यंत त्यांची लसीकरणाची स्थिती कंपनीला सांगणे आणि पुरावा दर्शविणारी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. त्या तारखेनंतर, कंपनी अशा कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्यास सुरुवात करेल ज्यांनी लसीकरणाबद्दल माहिती दिली नाही किंवा लसीकरण केलेले नाही" असं म्हटलं आहे.

"6 महिने बिनपगारी रजेवर पाठवण्यात येईल आणि नंतर कामावरून काढलं जाईल"

"जे कर्मचारी 18 जानेवारीपर्यंत लसीकरणाच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांना 30 दिवसांसाठी कंपनीकडून पगारी सुट्टीवर पाठवले जाईल. त्यानंतर सहा महिने त्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात येईल आणि नंतर कामावरून काढलं जाईल" असं ही म्हटलं आहे, रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने सीएनबीसीच्या अहवालावर थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु "आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना कोरोना लसीकरणात मदत करण्यासाठी आणि आमच्या लसीकरण धोरणात सहकार्य करण्यासाठी शक्य ते सर्व काही करण्यास वचनबद्ध आहोत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Corona Vaccine google will fire employees who do not get vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.