Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:21 AM2020-04-13T10:21:37+5:302020-04-13T10:29:24+5:30
Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले होते.
नवी दिल्ली - देशावर सध्या कोरोनाचं संकट आहे. जगभरात कोरोनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले असून अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. यामध्ये STAY HOME SAVE LIVES म्हणजेच घरात राहा आणि आपले आयुष्य वाचवा असा खास संदेश देत महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या होत्या. त्यानंतर आज गुगलने कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला डुडलच्या माध्यमातून सलाम केला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी अहोरात्र काम करत आहेत. डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून लांब आहेत. रुग्णांची सेवा करताना त्यांनी स्वत: ला झोकून दिलं आहे. कोरोनाशी सामना करणाऱ्या कोरोना वॉरियर्सचे गुगलने आभार मानले आहेत. त्यांना Thank you म्हणणारे खास डुडल तयार केले आहे. नेटिझन्सनेही या खास डुडलचं कौतुक केलं आहे.
गुगलच्या या खास डूडलमध्ये वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा इमोजी दिसत आहे. या संकटाशी सामना करणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोजी वापरण्यात आला आहे. तसेच डुडलवर क्लिक केल्यावर Thank you doctors, nurses and all healthcare workers असा एक व्हिडीओ ओपन होतो. यामध्ये डॉक्टर रुग्णांना सल्ला देताना दिसत आहेत. गुगलचे हे अॅनिमेटेड डुडल असून यामध्ये गुगलमधील O लेटरवर हार्ट इमोजी आहे तर E लेटर डॉक्टर, नर्स यांना चिन्हांमध्ये दाखवण्यासाठी वापरण्यात आलं आहे.
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय
कोरोनाचा सामना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी गुगलने एक खास डुडल तयार केले होते. या डुडलमध्ये सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय सांगितले होते. STAY HOME SAVE LIVES म्हणजेच घरात राहा आणि आपले आयुष्य वाचवा असा खास संदेश देत महत्त्वाच्या काही टिप्स दिल्या. डुडलमधील प्रत्येक अक्षर हे लोकांना घरात राहण्याच्या सूचना देत होतं. यामध्ये पुस्तक वाचणे, गिटार वाजवणे, व्यायाम करणे, मित्रांशी फोनवरून बोलणे याचा यात गोष्टींचा समावेश होता. गुगल डुडलवर क्लिक केल्यानंतर कोरोना व्हायरस टीप्सच्या पेजवर जाता येतं होतं. यामध्ये लोकांना काही सूचना करण्यात आल्या असून टीप्सचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक