CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 01:07 PM2020-06-15T13:07:58+5:302020-06-15T13:18:12+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 78 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मात्र आता मास्क हसणारा आणि बोलणारा मास्क आला आहे. अमेरिकेतील गेम डिझायनर आणि प्रोग्रामर टेलर ग्लेयल यांनी हटके मास्क तयार केला आहे. कोरोनापासून वाचवणारा LED मास्क तयार करण्यात आला आहे.
— Tyler Glaiel (@TylerGlaiel) May 25, 2020
हटके मास्कमध्ये एलईडी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. बोलताना तोंडाची हालचाल होईल त्यानुसार लाईट्स असणार आहेत. त्यामुळेच जेव्हा हसतो तेव्हा मास्कही हसताना दिसणार आहे. मास्कवर चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन दिसणार आहेत. एका मास्कची किंमत जवळपास 3800 रुपये आहे. टेलर यांनी हा मास्क सध्या तरी फक्त स्वत:साठी तयार केला आहे. विक्रीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
CoronaVirus News : घरी राहून कोरोनाची लढाई जिंकायचीय?; 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की ठेवा लक्षातhttps://t.co/ybD41rKMf4#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, कापडापासून हा भन्नाट मास्क तयार करण्यात आला असून त्यामध्ये 16 एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत. मास्कमध्ये आवाजासाठी एक खास पॅनेल लावण्यात आले आहे. तसेच एलईडीशी जोडण्यात आले. हा मास्क निर्जंतुकही करता येऊ शकतो. मात्र या मास्कचा वापर जास्त वेळही केला जाऊ शकत नाही. काही तासांनंतर एलईडी लाईट्स गरम होतात. त्यामुळे जास्त कालावधी मास्क वापरणाऱ्यांना आणि लहान मुलांसाठी हा मास्क योग्य नाही असंही टेलर यांनी स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना केल्या जारीhttps://t.co/3Ja14O9jk5#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"
Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा
Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"
CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 18 दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या बाळाने जिंकली कोरोनाची लढाई