Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple ने घेतला 'हा' मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:02 AM2020-03-21T11:02:23+5:302020-03-21T11:10:29+5:30
Coronavirus : कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे.
नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा अनेक कंपन्यांना फटका बसला आहे. कोरोना व्हायरसचा वेगाने होणारा संसर्ग पाहून अॅपलने एक मोठा निर्णय घेतला आहे. जर युजर्स एकावेळी एकापेक्षा अधिक आयफोन घेण्याचा विचार करत असतील तर त्यांना आता असं करणं शक्य होणार नाही. कारण अॅपलने अमेरिका आणि चीन व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये एका युजरला दोन पेक्षा जास्त आयफोन खरेदी करता येणार नसल्याचं सांगितलं आहे. कंपनीने कोरोनामुळे कमी उत्पादन आणि चीनबाहेर असलेले स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये यासाठी अॅपलने आपले स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या काही आयफोन्सच्या ऑनलाईन विक्रीवर दोन पेक्षा जास्त फोनची खरेदी करता येणार नाही. यामध्ये iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone XR, iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone 11 Pro Max चा समावेश आहे. तसेच आयफोन्ससोबतच अन्य काही अॅपल उत्पादनासाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. जर एखाद्या ग्राहकाला दोन पेक्षा अधिक आयफोनची खरेदी करायची असेल तर ते सर्व आयफोन हे वेगवेगळ्या मॉडलचे असणं गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना व्हायरसचा फटका हा स्मार्टफोन कंपन्यांना देखील बसला आहे. अॅपलचं या व्हायरसमुळे मोठं नुकसान झालं आहे. TF इंटरनेशनल सिक्यॉरिटी अॅनालिस्ट मिंग-ची कुओने 2020 च्या पहिल्या तिमाहीत अॅपलच्या शिपमेंटमध्ये 10 टक्क्यांनी घट झाल्याचं सांगितलं आहे. कुओने पहिल्या तिमाहीत ग्लोबल आयफोन शिपमेंट 36 ते 40 मिलियन असून ती आधीच्या तुलनेत 10 टक्के कमी झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्याने कंपनीने चीनमधील आपले कॉर्पोरेट ऑफिस, स्टोर आणि रिपेरिंग सेंटर बंद केले आहेत. तसेच अँड्रॉईड उत्पादनाचे कारखाने बंद करण्यात आले आहेत.
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावाhttps://t.co/sWRRpPnm7C#coronavirus#5G
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2020
वेगाने वाढणाऱ्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय केले जात आहे. कोरोनामुळे 184 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 11,267 वर पोहोचली आहे. तर जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,69,911 वर पोहोचली आहे. याच दरम्यान 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार असा दावा आता चीनने केला आहे. जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, आणि 4G नंतर आता 5G इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र याचा वापर आता हा कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?https://t.co/29BUQxce4W#coronavirusindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 5G टेक्नॉलॉजी कोरोना व्हायरस नष्ट करणार,चीनचा दावा
Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’
MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ
Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न