Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:19 PM2020-04-21T13:19:59+5:302020-04-21T13:25:04+5:30
परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. जिओने आपल्या लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर टेलिकॉम प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही आपल्या प्लॅनमध्ये कपात करावी लागली. परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.
रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा पॅक आहेत. पण कंपनीकडेही एक वार्षिक प्लॅनही आहे. आम्ही आपल्याला कंपनीच्या या दीर्घकाळ वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. जिओकडे एक प्लॅन आहे, ज्याची वैधता 360 दिवसांची आहे म्हणजे संपूर्ण वर्षभर. या प्रीपेड प्लॅनची किंमत 4,999 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 350 जीबी डेटा उपलब्ध आहे.
या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये आपणास जिओ ते जिओसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, तसेच जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटे मोफत मिळतील. म्हणजेच आपल्याकडे दरमहा 1,000 कॉलिंग मिनिटांचा पर्याय आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे. जिओचे हे प्रीपेड पॅक घेतल्यास आपणास जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळेल. एकंदरीत जिओच्या वर्षभराच्या वर्षभराच्या प्लॅनचं रिचार्ज केल्यास दरमहिन्याला रिचार्ज करावं लागणार नाही. आपण केलेले हे रिचार्ज एक वर्ष चालेल. जिओने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी प्रीपेड पॅकची वैधता वाढविली आहे. म्हणजेच जर वापरकर्त्याच्या प्रीपेड योजनेची वैधता संपली तर नि: शुल्क इनकमिंगची सुविधा चालू राहील जेणेकरून ते आपल्या मित्रांसह आणि कुटुंबाशी संपर्कात राहू शकतील.
रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे. MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.