'या' देशात इंटरनेट सुस्साट! 377.2Mbps चा स्पीड, काही सेकंदात HD चित्रपट डाऊनलोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 05:34 PM2020-10-21T17:34:06+5:302020-10-21T17:38:43+5:30
5G Internet Speed : साधारणपणे 5G इंटरनेट स्पीड 377.2Mbps आहे. त्यामुळे अवघ्या सेकंदात एचडी चित्रपट आणि हेवी डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो.
जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, 4G नंतर आता 5G इंटरनेट सेवा लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. जगभरात सध्या 5G चे नेटवर्क मजबूत करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. साऊथ कोरियात साधारणपणे 5G इंटरनेट स्पीड जवळपास 336.1 मेगाबिट्स प्रति सेकंद (Mbps) मिळतो. तर सर्वात फास्ट इंटरनेट स्पीड सौदी अरेबियामध्ये युजर्संना मिळतो. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
सौदी अरेबियामध्ये साधारणपणे 5G इंटरनेट स्पीड 377.2Mbps आहे. त्यामुळे अवघ्या सेकंदात एचडी चित्रपट आणि हेवी डेटा डाऊनलोड केला जाऊ शकतो. इंडस्ट्री ट्रॅकर ओपन सिग्नलकडून लेटेस्ट रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सौदी अरेबियामध्ये 5G डाऊनलोड स्पीड 377.2Mbps मिळाली. जगभराच्या तुलनेत हा स्पीड सर्वात जास्त आहे. OpenSignal कडून 1 जुलै ते 28 सप्टेंबर या दरम्यान जगातील 15 देशाच्या 5जी इंटरनेट स्पीडची टेस्ट करण्यात आली.
सौदी अरेबियानंतर साऊथ कोरिया दुसऱ्या स्थानावर आहे. या ठिकाणी युजर्सला 336.1Mbps चा एवरेज 5G स्पीड मिळतो. 5G एक्सेसिबिलिटी मध्ये साऊथ कोरिया पाचव्या स्थानावर आहे. लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्ये 37 टक्के, कुवेतमध्ये 27.7 टक्के, थायलंडमध्ये 94.9 टक्के आणि हाँगकाँगमध्ये 22.9 टक्के युजर्सला 5 जी नेटवर्कचे एक्सेस मिळाले आहे. साऊथ कोरियात जवळवास 87 टक्के 5 जी मोबाईल अकाऊंट्स आहेत.
भारतात टेलिकॉम कंपन्यानी 5 जी कनेक्टिविटीवर काम सुरू केले आहे. पुढील वर्षाच्या दरम्यान याची टेस्ट केली जाऊ शकते. मोबाईल चिपसेट बनवणाऱ्या अमेरिकेच्या क्वॉलकॉमने भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सोबत 5 जी ची टेस्टिंग केली आहे. भारतात युजर्संना 1Gbps पर्यंत 5G स्पीड मिळेल अशी माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
WhatsApp युजर्ससाठी खूशखबर!https://t.co/0pRZCsr1WM#WhatsApp#technology
— Lokmat (@MiLOKMAT) October 20, 2020