Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:19 PM2021-05-12T12:19:00+5:302021-05-12T12:26:54+5:30

Covid19 Vaccine Registration Fraud : फेक मेसेजद्वारे आता लोकांना लक्ष्य केले जात आहे. हे मॅसेज Appद्वारे नोंदणी करण्याचा दावा करतात. खोटी लिंक देऊन फसवतात.

covid19 vaccine registration fraud or suspicious sms to android phone user cyber agency-cert in alerts | Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

Covid-19 Vaccination च्या नावाने होतेय मोठी फसवणूक; फेक मेसेजने हॅकर्स ओढताहेत जाळ्यात; वेळीच व्हा सावध

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. App द्वारे लसीकरणाची नोंदणी केली जात आहे. मात्र लसीकरणाचा स्लॉट बुक करण्यात देखील अनेक अडचणी येत आहेत. याच दरम्यान हॅकर्स सक्रिय झाले असून याचा गैरफायदा घेत आहेत. लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. फेक मेसेजद्वारे आता लोकांना लक्ष्य केले जात आहे. हे मॅसेज Appद्वारे नोंदणी करण्याचा दावा करतात. खोटी लिंक देऊन फसवतात. युजरने या लिंकवर क्लिक करताच त्याचा डेटा हॅकरकडे जातो. ज्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या देशात बनावट मेसेजेस वेगाने पसरत आहे. यामध्ये युजर्सना कोरोना लस नोंदणीसाठी खोट्या अ‍ॅपबद्दल सांगितले जाते. एक लिंक देण्यात येते त्यावर क्लिक करून ते अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये स्थापित केले गेले आहे. हा संपर्कांद्वारे लोकांमध्ये पोहोचला आहे. एक फेक मेसेज व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये युजर्स एका अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना लसीसाठी नोंदणी करण्याचा दावा करतात. त्यात बनावट अ‍ॅपची लिंक आहे, त्यावर क्लिक करून फोनमध्येच बनावट अ‍ॅप डाऊनलोड केले जाते. यापूर्वी देखील असाच बनावट मॅसेज, लिंक व्हायरल झाले होते. त्यामध्ये लसीकरणासाठी मोफत नोंदणी करण्याचे आश्वासन दिले जात होते.

खोटा App युजर्सच्या फोनमध्ये डाऊनलोड होतो आणि नंतर त्याच्या संपर्कात प्रवेश घेऊन मेसेजद्वारे सर्वत्र पसरतो. तसेच हा फेक अ‍ॅप फोनमधील खासगी माहितीमध्ये मिळवू शकतो. यापूर्वी या अ‍ॅपचे नाव कोविड -19 असे होते, परंतु नंतर ते बदलून कोविड-19 लस रजिस्टर करण्यात आले. लक्षात ठेवा, लसीसाठी नोंदणी केवळ कोवीन वेबसाईट किंवा आरोग्य सेतू अ‍ॅप वापरुन करायची आहे. कोविड -19 लस नोंदणीचा दावा करणारा असा कोणताही मेसेज क्लिक किंवा शेअर करू नका. सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् Instagram वर आपोआप डिलीट होताहेत स्टोरीज; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण

इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता इन्स्टाग्राम युजर्सना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी त्यांनी केलेल्या पोस्ट अचानक डिलीट (Post delete) होत असल्याची तक्रार केली आहे. अनेक युजर्सच्या तक्रारींनंतर इन्स्टाग्रामने हा एक बग असल्याची माहिती दिली असून तो फिक्स केला असल्याचंही सांगितलं आहे. या बगमुळे पोस्ट, स्टोरीज तसंच हायलाईट्स देखील गायब होत होत्या. कंपनीचे प्रमुख एडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सला ही समस्या एका बगमुळे आली असून ती आता फिक्स केली असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्राममध्ये ही समस्या त्यावेळी आली, ज्यावेळी काही कार्यकर्ते हरवलेल्या महिलांबाबत जागरुकता अभियान चालवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या एखाद्या विषयाशी किंवा ठिकाणाशी संबंधित नव्हती, परंतु याचा परिणाम जगभरातील युजर्सवर पाहायला मिळाला, ज्यांना ही समस्या आली. कंपनीने यात भारताचा उल्लेख केला नसला, तरी देशातील अनेक युजर्सनी इन्स्टाग्रामवर कोविड-19 शी संबंधित अपडेटबाबत या समस्येचा उल्लेख केला आहे.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Read in English

Web Title: covid19 vaccine registration fraud or suspicious sms to android phone user cyber agency-cert in alerts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.