क्रोमा फ्रिज: डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा आनंददायी अविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 01:48 PM2022-11-12T13:48:12+5:302022-11-12T15:13:55+5:30

क्रोमा फ्रिजने स्वयंपाकघरातील वस्तूंचे महत्त्व ओळखले आहे. त्यामुळेच क्रोमा आकर्षक रंगातील आणि टेक्चर्समधील फ्रिज घेऊन मार्केटमध्ये आले आहेत.

Croma fridge A delight in design and tech | क्रोमा फ्रिज: डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा आनंददायी अविष्कार

क्रोमा फ्रिज: डिझाईन आणि तंत्रज्ञानाचा आनंददायी अविष्कार

googlenewsNext

सध्याच्या युगात तुमचे स्वयंपाकघर म्हणजे केवळ जेवण बनवण्याचे एक ठिकाण इतकेच मर्यादित राहिलेले नाही. आजकाल, स्वयंपाकघर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी सजवलेले आणि अत्यधुनिक तंत्रज्ञानाच्या बरोबरीने नटलेले असते. त्यामुळे स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू अधिक कार्यक्षम बनते. क्रोमा फ्रिजने स्वयंपाकघरातील वस्तूंचे महत्त्व व सजावटीचा अँगल ओळखला आहे. त्यामुळेच क्रोमा आकर्षक रंगातील आणि टेक्चर्समधील फ्रिज घेऊन मार्केटमध्ये आले आहेत, ज्या फ्रिजची नक्कीच सर्वत्र चर्चा आणि कौतुक केले जाईल.

स्वयंपाकघर हे तुमच्या घरातील केवळ एक खोली नसून तुमच्या घराचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे. शहरांमधील घरांच्या वाढलेल्या किमती पाहता, सर्वांसाठी आपल्या घरात डायनिंग रूम बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे डायनिंग रूमची जागा ही स्वयंपाकघरात आपोआपच ढकलली जाते. तसेच, आधुनिक आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाइनचा विचार करता शक्य तितकी जागा राहण्यासाठी (वापरण्यासाठी) मिळावी, अशा पद्धतीने कार्पेट एरियाचा अंदाज घेतला जातो आणि लेआउटचे नियोजन करताना स्वयंपाकघरालाही तितकेच महत्त्व दिले जाते. या सर्वांमुळे किचन हा घराचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

स्वयंपाकघर ही आता कुटुंबातील सदस्यांची एक आवडती जागा बनत चालली आहे. स्वयंपाकघराचा वापर हल्ली जेवणासाठीची जागा, गृहिणींसाठी आलेल्या मैत्रिणींशी उभं राहून काम करता-करता गप्पा मारण्याचे ठिकाण, सणवाराच्या वेळी स्वादिष्ट पदार्थांच्या तयारीसाठी सहभागी होण्याची जागा आणि एक सुंदर डायनिंग रूम असा विविध प्रकारे केला जातो. याचा अर्थ स्वयंपाकघरातील इंटिरियर डिझाइन हे लिव्हिंग रूमच्या इतकेच महत्त्वाचे होत चालले आहे. त्यामुळेच लोक घरातील किचन परिसराला अधिक चांगल्या पद्धतीने सजवण्याकडे लक्ष देतात. आजकाल लोक स्वयंपाकघर अधिक सुंदर दिसावे यासाठी खर्च करण्याची तयारी दर्शवतात आणि त्या गरजा त्वरित पूर्ण करण्यासाठी किचनला उपयोगी पडणारे प्रोडक्ट्स, गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी बनवणाऱ्या कंपन्या सज्ज आहेत.

स्वयंपाकघर सुंदर बनवण्यात फ्रिजचा मोठा वाटा

आजकाल कोणत्याही स्वयंपाकघरात फ्रिज हे उपकरण सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळेच किचनमधील सर्वात महत्त्वाच्या जागी फ्रिज ठेवला जातो. फ्रिज हा किचनमधील वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापरले जाणारे प्रोडक्ट आहे. फ्रिज हे चिमुरड्यांना चॉकलेट्स किंवा मिठाई मिळण्याचे हक्काचे ठिकाण आहे. तसेच जास्त भूक लागणाऱ्यांसाठी फ्रिज कोणत्याही वेळी जणू 'अन्नदाता'च असतो. अचानक आलेले पाहुणे असोत, मध्यरात्रीची भूक असो किंवा रोजचे जेवण असो.. फ्रिज या सगळ्यांची आपुलकीने काळजी घेतो.

एकेकाळी फ्रिज हा केवळ 'शीतकपाट' या नावाप्रमाणे जेवण किंवा पाणी थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा एक डब्बा असायचा. त्यामुळे अतिशय साधेपणा असलेला सफेद रंगाचा फ्रिज हेच सर्वत्र दिसायचे. पण आता फ्रिजबद्दल लोकांची मागणी बदलताना दिसते आहे. आता किचनच्या इंटिरियर डिझाइनला मिळताजुळता फ्रिज घेण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणूनच क्रोमा रेफ्रिजरेटर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत डिझाइन आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असलेले अतिशय दर्जेदार फ्रिज.

क्रोमा डेकॉरचे फायदे

क्रोमा रेफ्रिजरेटर मध्ये आधुनिक स्वयंपाकघरात सुयोग्य वाटेल अशा स्टाईलचे आणि स्पेसिफिकेशनचे फ्रिज आहेत. आजकाल स्वयंपाकघराला स्वत:चे सौंदर्य, मांडणी आणि रंग असतो. त्यामुळे स्वयंपाकघरात येणारी महत्त्वाची गोष्ट ही त्या स्टाईल आणि रंगाला साजेशी असणे जास्त आवश्यक असते. क्रोमा फ्रिज हा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय आहेच. पण त्यासह बहुतेक वेळा क्रोमा फ्रिज हे किचनच्या इंटिरियर डेकोरेशनच्या दृष्टीनेही अधिक प्रभावी ठरताना दिसतात. ते चमकदार आणि उठावदार रंगांमध्ये आणि उत्कृष्ट स्पेसिफिकेशन्सने युक्त आहेत. आणि कोणत्याही स्वयंपाकघरातील इंटेरियरमध्ये कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग अशा दोन्ही स्टाइलमध्ये उपलब्ध आहेत.

सजावटीच्या अनुषंगाने

क्रोमा फ्रिज सजावटीच्या अँगलने सुयोग्यपणे तयार करण्यात आले आहेत. क्रोमा फ्रीज किचनच्या रंगछटा आणि टेक्स्चर स्कीम्ससह विविध रंगांमध्ये उठून दिसतात. जर किचनची इंटिरियर स्कीम काळ्या आणि लाल छटांसह स्टीलशी संबंधित असेल, तर चंदेरी आणि काळ्या आयनॉक्स रंगाच्या छटांमधील फ्रिज क्रोमाकडे उपलब्ध आहेत. ते फ्रिज तुमच्या घरातील ती स्टायलिंग स्कीम अधिक उठावदार करू शकतील.

किचन जर पांढऱ्या आणि पेस्टल शेड्सच्या रंगांमध्ये असेल तर वुड फिनिश ग्रॅनाइट किंवा वाइन रेड फ्रिज हा उत्तम पर्याय ठरेल.

हे फ्रीज अशा शेड्समध्ये आहे जे स्वयंपाकघरातील कलर स्कीमशी मिसळून दिसतील किंवा अत्यंत कॉन्ट्रास्ट रंगासह किचनमध्ये अतिशय ठळकपणे उठून दिसतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फंक्शन्स हा प्रत्येक फ्रिजमधील मूलभूत भाग असतोच. पण हे स्पेशल स्टाइलचे फ्रिज हे किचनमधील डिझाइनसाठी तुम्हाला अधिक उपयुक्त ठरतील. क्रोमा फ्रिज स्वयंपाकघरात आनंददायी वातावरण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. क्रोमा फ्रिज तुमचे स्वयंपाकघर इतके सुंदर बनवतात की तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना तुम्ही आवर्जून तुमचे स्वयंपाकघर पाहण्याचे आमंत्रण देऊ शकता, तसेच तुमच्या व्यस्त आणि धावपळीच्या व्यापातून विसाव्याचा क्षण म्हणून तुम्ही क्रोमा फ्रिज असलेल्या किचनचा नक्कीच आधार घेऊ शकता.

उत्कृष्ट कामगिरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

क्रोमा फ्रीज तुमच्या स्वयंपाकघरातील बहुतांश गोष्टींना अधिक कार्यक्षम बनवते आणि जीवन आरामदायक बनवण्यासाठी सर्व वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहेत. डबल डोअर, फ्रॉस्ट फ्री, क्विक कूलिंग, मल्टी एअर फ्लो सिस्टीम, साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर आणि वाढवून मिळणारी वॉरंटी या गोष्टींमुळे क्रोमा फ्रिज विकत घेणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.

Web Title: Croma fridge A delight in design and tech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.