GPS आणि Calling फीचर्स असलेलं Smartwatch; फिट राहण्यासाठी करेल मदत  

By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2022 05:16 PM2022-06-16T17:16:51+5:302022-06-16T17:17:35+5:30

Crossbeats Ignite ATLAS नावाचं Smartwatch भारतात लाँच करण्यात आलं आहे, ज्यात GPS आणि कॉलिंग फीचर देण्यात आलं आहे.  

crossbeats ignite atlas smartwatch launched with gps enabled and calling feature check price   | GPS आणि Calling फीचर्स असलेलं Smartwatch; फिट राहण्यासाठी करेल मदत  

GPS आणि Calling फीचर्स असलेलं Smartwatch; फिट राहण्यासाठी करेल मदत  

Next

Crossbeats नं भारतातील आपला स्मार्ट अ‍ॅक्सेसरीजचा पोर्टफोलियो वाढवला आहे. Crossbeats Ignite ATLAS ची एंट्री झाली आहे. यात हाय प्रिसिजन ड्युअल-सॅटेलाईट ग्लोनास जीपीएस देण्यात आलं आहे. हे फिचर ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलं आहे. यामुळे स्मार्टवॉचमध्ये अचूक नेव्हिगेशन मिळतं. Crossbeats Ignite ATLAS ची विक्री कंपनीच्या वेबसाईटवरून केली जाईल, याची किंमत किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Crossbeats Ignite ATLAS चे स्पेसिफिकेशन्स  

Crossbeats च्या या नव्या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा HD (240×280) IPS टच स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत, जे कस्टमायजेशनमध्ये मदत करतात. हा डिस्प्ले 99.5 टक्के वाईड कलर गमुटला आणि 500 नीट्स पीक ब्राईटनेसला स्पॉट करतात. हे वॉच प्रीमियम एबीएस मटेरियलपासून बनवण्यात आलं आहे आणि यात IP67 वॉटर आणि डस्ट रेटिंग मिळते.  

Ignite Atlas वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लडप्रेशर मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, पेडोमीटर, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि स्लिप ट्रॅकिंग देण्यात आली आहे. यात रनिंग, हायकिंग, बायकिंग आणि स्विमिंग सारखे 30 प्रीसेट स्पोर्ट्स मोड मिळतात. स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन जीपीएस, ड्युअल सॅटेलाईट GLONASS आणि मल्टी मोशन अ‍ॅक्टिव्हिटी सेन्सर मिळतात. ब्लूटूथ कॉलिंग आणि व्हॉईस असिस्टंट सपोर्टमुळे याची उपयुक्तता आणखी वाढते. यातील 420mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 10 दिवस वापरता येते.  

Web Title: crossbeats ignite atlas smartwatch launched with gps enabled and calling feature check price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.