ब्लड प्रेशर ठेवणार ‘वॉच’; 2 हजारांच्या आत 15 दिवसांची बॅटरी लाईफ असलेलं Smartwatch 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:49 PM2022-05-03T12:49:13+5:302022-05-03T12:49:23+5:30

Crossbeats Ignite Lyt Smartwatch भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर आणि IP68 वॉटर रेजिस्टन्ससह लाँच झालं आहे.  

Crossbeats Ignite Lyt Smartwatch Launched In India With 7 Days Battery Life Priced At Rs 1999   | ब्लड प्रेशर ठेवणार ‘वॉच’; 2 हजारांच्या आत 15 दिवसांची बॅटरी लाईफ असलेलं Smartwatch 

ब्लड प्रेशर ठेवणार ‘वॉच’; 2 हजारांच्या आत 15 दिवसांची बॅटरी लाईफ असलेलं Smartwatch 

Next

Crossbeats Ignite Lyt नावाचं स्मार्टवॉच भारतात सादर करण्यात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर आणि IP68 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स देण्यात आले आहेत. किंमत कमी असू देखील Crossbeats नं एक हलकं आणि शानदार डिजाइन असलेलं स्मार्टवॉच लाँच केलं आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Crossbeats Ignite Lyt चे स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मल्टी-स्पोर्ट्स मोड आणि 7 दिवसांचं स्लिप ट्रॅकिंग डेटा ठेवला जातो. या स्मार्टवॉचमध्ये रक्तातील ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी SpO2 ट्रॅकर देण्यात आला आहे. तसेच 24 तास हृदयावर रीयल-टाइममध्ये लक्ष ठेवण्यासाठी हार्ट रेट ट्रॅकिंग देण्यात आलं आहे.  कंपनीनं ब्लड प्रेशर मॉनिटर देखील यात दिला आहे. 

यातील IP68-सर्टिफिकेशन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा करतं. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 15 दिवस वापरता येतं. इग्नाइट लिट स्मार्टवॉच थिएटर आणि डीएनडी मोड सारखे फीचर्स असलेलं सर्वात हलकं घड्याळ आहे, असा दावा कंपनी केला आहे. हा वॉच क्रॉसबीट्स एक्सप्लोर या अ‍ॅपशी कनेक्ट करता येतं.  

किंमत  

Crossbeats Ignite Lyt स्मार्टवॉचची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या घड्याळाची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून केली जाईल. तुम्ही हे स्मार्टवॉच कार्बन ब्लॅक, सॅफायर ब्लू आणि जेनिथ गोल्ड या तीन रंगात विकत घेऊ शकाल. 

 

Web Title: Crossbeats Ignite Lyt Smartwatch Launched In India With 7 Days Battery Life Priced At Rs 1999  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.